सोशल मीडियावर रोजच व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत अस्वलाची पिल्लं अन्नाच्या शोधात गाडीकडे येतात आणि गाडीतील व्यक्तीच्या हातून सँडविच घेण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाहीत अस्वलाने गाडीचा दरवाजा उघडण्याचा दोनदा प्रयत्न देखील केलं. त्यांची हुशारी पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅलिफोर्नियातील बिल डुव्हल हे आपल्या कारमध्ये बसलेला असताना एका भुकेल्या अस्वलाने कारचा दरवाजा उघडला. ABC7 ने शेअर केलेल्या क्लिपमध्ये, अस्वलाची तीन पिल्ले रस्त्याच्या कडेला अन्नाचा शोध घेत होती. त्यापैकी एक पिल्लं गाडी पुढे आलं आणि मागच्या पायावर उभा राहिलं आणि दरवाजा उघडला. त्यानंतर डुव्हल यांनी पटकन दरवाजा बंद केला. मात्र, अस्वलाने बिनधास्त राहून सँडविच घेण्यासाठी पुन्हा दरवाजा उघडला. “मी नुकतेच बाजारातून सँडविच घेऊन आलो होतो. आणि, मी माझ्या मार्गाने जात होतो. मध्ये थांबल्यानंतर मी पाहिलं दोन पिल्लं माझ्याकडे येत होती. ते अगदी दारापाशी आले होते. त्याने दोनदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ”, असं डुव्हल यांनी सांगितलं.

यापूर्वी अस्वलाचा वाघाशी सामना झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अस्वल आपल्या वाटेवर बसलेलं असताना वाघ तिथे आला. मात्र त्याला न घाबरता वाघाचा सामना करण्यासाठी त्याच्या मागच्या पायावर उभे राहिले होते.