सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात. त्यातील काही त्यांच्या गोंडस हावभावावर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून धक्क करणारे असतात. माणसांप्रमाणे प्राणी देखील अडचणीत सापडल्यावर लगेच मदतीसाठी पुढे येतात, असे काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्यात बुडणाऱ्या कावळ्याला अस्वल मदत करताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘ नेटिव्ह अमेरिकन सोल’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘बूडापेस्ट’ प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडीओमध्ये एक कावळा पाण्यात बुडताना दिसत आहे. कावळा पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिथल्या अस्वलाला दिसते. लगेच ते अस्वल त्या पानवठ्याजवळ जात कावळ्याला बाहेर निघण्यासाठी मदत करतो. त्या कावळ्याला इजा होणार नाही अशा पद्धतीने अस्वल कावळ्याच्या पंखांना दातात पकडून त्याला बाहेर काढते. अस्वलाच्या या मदतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : या महिलेने पाळला चक्क सिंह; Viral Video वर नेटकऱ्यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओला ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्राण्यांमध्येही मदत करण्याची भावना असते असते हे दाखवणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला आहे.

Story img Loader