जेव्हा तुम्ही स्वत:ला पहिल्यांदाच आरशात पाहिलं, त्यावेळी तुमची रिअॅक्शन कशी होती? तुम्हाला तुमचं पहिलं मिरर रिअॅक्शन आठवतय का? पहिल्यांदा आरशात पाहिल्यावर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. आपण स्वत:ला आरशात नेहमीच पाहत असतो. परंतु, प्राण्यांबाबत असं काही होत नाही. माणसांकडे असणाऱ्या अनेक गोष्टी प्राण्यांकडे नसतात. त्यामुळे प्राणी जेव्हा अशा गोष्टींना पाहतात, ज्यांना त्यांनी कधीच पाहिलेलं नसतं, अशावेशी त्या प्राण्यांची रिअॅक्शन खूप वेगळी असते. प्राण्यांनी स्वत:ला आरशात पाहिल्यावर त्यांचे हावभाव कशाप्रकारे असतात, हे कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. पण एका अस्वलाच्या व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. कारण जंगलात लावलेल्या आरशात अस्वलाने स्वत:चा चेहरा पाहिला अन् त्या अस्वलाने पुढे जे काही केलं, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, अस्वल पहिल्यांदा स्वत:ला आरशात पाहतो आणिी त्यानंतर तो चक्रावून जातो. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांनी क्वचितच कधी आरशात पाहिलं असेल. एका व्यक्तीने अस्वलाची रिअॅक्शन पाहण्यासाठी एक आरसा जंगलात ठेवला. त्यानंतर अस्वलाने आरशात पाहिलं आणि स्वत:चा चेहरा पाहून त्या अस्वलाने आरसाच फोडला.
आरशात पाहिल्यावर अस्वलाने केलं भन्नाट कृत्य
इथे पाहा अस्वलाचा मजेशीर व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, जंगलात एक अस्वल फिरत असतो. जंगलात संचार करत असताना त्या अस्वलाची नजर अचानक त्या आरशावर पडते. आरशात स्वत:ला पाहिल्यानंतर त्या अस्वलाला आश्चर्य वाटतं. आरशाच्या पाठीमागे कुणीतरी आहे, असं अस्वलाला वाटतं आणि त्यानंतर तो आरशाच्या मागे वळून पाहतो. मात्र, आरशाच्या पाठीमागे कुणीही नसल्याचं अस्वलाला समजतं आणि त्यानंतर पुन्हा तो अस्वला आरशात पाहतो. पण आरशात स्वत:ला पाहतो आणि आरसाच फोडून टाकतो.