जेव्हा तुम्ही स्वत:ला पहिल्यांदाच आरशात पाहिलं, त्यावेळी तुमची रिअॅक्शन कशी होती? तुम्हाला तुमचं पहिलं मिरर रिअॅक्शन आठवतय का? पहिल्यांदा आरशात पाहिल्यावर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. आपण स्वत:ला आरशात नेहमीच पाहत असतो. परंतु, प्राण्यांबाबत असं काही होत नाही. माणसांकडे असणाऱ्या अनेक गोष्टी प्राण्यांकडे नसतात. त्यामुळे प्राणी जेव्हा अशा गोष्टींना पाहतात, ज्यांना त्यांनी कधीच पाहिलेलं नसतं, अशावेशी त्या प्राण्यांची रिअॅक्शन खूप वेगळी असते. प्राण्यांनी स्वत:ला आरशात पाहिल्यावर त्यांचे हावभाव कशाप्रकारे असतात, हे कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. पण एका अस्वलाच्या व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. कारण जंगलात लावलेल्या आरशात अस्वलाने स्वत:चा चेहरा पाहिला अन् त्या अस्वलाने पुढे जे काही केलं, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा