Viral Video: उन्हाळ्याच्या सुटीत खेळ, मजा-मस्ती तर असायचीच. पण, एक रुपयाची पेप्सीही तितकीच लोकप्रिय असायची. खेळून खेळून दमायला झालं की, एक-दोन रुपयांची पेप्सी डेअरीवरून आणायची. या पेप्सीमधेही अनेक फ्लेवर्ससुद्धा असायचे. काळा खट्टा, हाजमोला, ऑरेंज आदी विविध रंगांत उन्हाळ्यात थंडावा देणारी ही पेप्सी उपलब्ध असायची. डेअरीवरून पेप्सी आणली की, आई आपल्याला अनेकदा ही गटाराच्या पाण्यानं बनवली जाते, असं सहज म्हणून जायची . तर नक्की ही पेप्सी कशी बनवली जाते हा प्रश्न तेव्हाही होता आणि आजही अनेकांच्या मनात असतो. तर, आज एक कन्टेट क्रिएटर या प्रश्नाचं उत्तर व्हिडीओद्वारे घेऊन आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ एक रुपयाची पेप्सी बनविण्याच्या कारखान्यातील आहे. पहिल्यांदा गॅसवर एक मोठं पातेलं ठेवण्यात आलं आहे. त्यात पाणी आणि साखर घातली आहे. त्यानंतर साखर विरघळण्यासाठी ते द्रावण चमच्यानं हलवण्यात आलं आहे. त्यानंतर या भांड्यात एक यंत्र घालून मिश्रण एकजीव केलं जात आहे. त्यानंतर ज्या फ्लेवरची पेप्सी बनवायची आहे तो फूड कलर टाकून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव केलं जात आहे आणि थोडं पाणीसुद्धा वरून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर पुन्हा यंत्राच्या साह्यानं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं जात आहे. एकंदरीत तुमची आवडती पेप्सी कशी तयार होते ते पाहा.

हेही वाचा…अशक्य ते शक्य करण्यासाठी शर्थ… काचेच्या बाटल्यांवर शिलाई मशीन ठेवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न; पाहा ‘हा’ व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पातेल्यात तयार करून घेतलेलं मिश्रण गाळणीच्या मदतीनं गाळून घेतलं जात आहे आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पांढऱ्या टाकीमध्ये भरून ठेवलं जात आहे. टाकी पूर्ण भरली की, व्हिडीओ पॅकेजिंगकडे वळवला जातो. त्यानंतर यंत्राद्वारे पेप्सीचं प्लास्टिक कव्हर फोल्ड करून घेतलं जात आहे. त्यानंतर तयार केलेलं पेप्सीचं मिश्रण त्यात यंत्राद्वारे त्यात भरलं जात आहे आणि पॅक केलेल्या तयार पेप्सी एका ट्रेमध्ये जमा केल्या जात आहेत. त्यानंतर विक्रीसाठी एक रुपयाची थंडगार पेप्सी पाठवली जात आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @food_hunter_17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शूट करणारा तरुण एक ब्लॉगर आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून लहानपणीच्या आठवणीत रमले आहेत. तसेच एका युजरनं कमेंट केली आहे, “आईला रील शेअर करते… ती म्हणायची की, गटाराच्या पाण्यातून पेप्सी तयार होते.” तर दुसरा युजर म्हणतोय की, पेप्सी कशी बनते हे पाहिलं. आता मी याचं जास्त सेवन करेन. तर अनेक जण पेप्सीचे त्यांचे आवडते कोणते फ्लेवर्स आहेत ते कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. तुम्ही सगळ्यात शेवटी पेप्सी कधी खाल्ली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beat the heat how one rupees pepsi made in factory with automatic packing machine watch full viral video asp
Show comments