crime news: सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने “मन” आणि “बुध्दी” बहाल केलीय..द्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत.
पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय… आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय. याचंच उदाहरण म्हणजे एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक दिव्यांग व्यक्ती स्कूटीवर बसला आहे, त्याठिकाणी एक धडधाकट व्यक्तीही आहे. मात्र हाच व्यक्ती त्या दिव्यांगाला मारहाण करत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं लोखंडी रॉडने हा व्यक्ती दिव्यांगाला मारहाण करत आहे, यानंतर एक महिलाही त्याठिकाणी येते आणि मारहाण करु लागते. तसंच त्याच्या गाडीच्या काचा फोडते आणि दिव्यांग व्यक्तीला तिथून जाण्यास सांगत आहे.
पाहा व्हाडिओ
हेही पाहा – विमानातून प्रवास करताना ‘हे’ पदार्थ आजिबात खाऊ नका, एअर हॉस्टेसने सांगितली किचनच्या स्वच्छतेची अवस्था
ही घटना कुठची आहे याची माहिती मिळाली नसली तरी सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरीही यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.