भारत देशाला निसर्ग सौंदर्याची खाण म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. कारण सौंदर्याच्या विविधतेनं नटलेल्या भारतात एकाहून एक सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात. कधी रेल्वे प्रवास करताना, कधी विमान प्रवासात, तर कधी रस्त्यावरून जाताना अतुल्य भारताचं दर्शन होतं. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बंगळुरु-उडुपी रेल्वेमार्ग घनदाट जंगलातील हिरव्यागार झाडीतून प्रवास करते, याचा सुंदर व्हिडीओ ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. छायाचित्रकार राज मोहन यांनी या रेल्वे ट्रॅकचा जबरदस्त व्हिडीओ शूट केला आहे.

नॉर्वेचे डिप्लोमॅट एरिक सोल्हेम यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलं आहे. असा हिरवागार रेल्वे रुट आणखी कुठं आहे का? बंगळुरु-उडुपी रेल्वे लाईन, सकलेश्वर ते कुर्की सुब्रमण्या, कर्नाटका.. असं सोल्हेम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सोल्हेम यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच या व्हिडीओला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८६ हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून ४ हजार लाईक्सही मिळाले आहेत.

Viral Video
Kanpur Viral Video : चोरट्याने देवाला आधी जल अर्पण केलं अन् मग चोरला कलश; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Punekar aaji danced on the terrace of the house
पुणेकर आजी! मिरवणूक पाहून आजीला डान्सचा मोह आवरला नाही, घराच्या छतावर केला बिनधास्त डान्स, पाहा VIDEO
Monkeypox in India
Monkeypox in India : काळजी घ्या! भारतात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निवेदन
as Passenger requested to IndiGo pilot to speak in Hindi
प्रवाशाच्या विनंतीवरून पायलटने केली चक्क हिंदीमध्ये अनाउंसमेंट; नेटकरी म्हणाले, “खूप चांगला प्रयत्न केला” VIDEO VIRAL
14-foot crocodile enters human settlement through flood waters
बापरे! पुराच्या पाण्यातून १४ फुटांच्या मगरीचा मानवी वस्तीत शिरकाव; Video पाहून अंगावर येईल काटा
Maharashtra Hit-And-Run Video: Man Critically Injured After Being Thrown Into Air By Speeding Car In Kolhapur; Driver Flees Spot video
नाईट ड्युटीसाठी निघाला, कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच…; कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा

नक्की वाचा – दोघांची नजरेला नजर भिडली, बिबट्या कासवगतीनं आला, नंतर गिअर बदलला, पाहा हरणाच्या शिकारीचा थरारक Video

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्राम युजर आणि फोटोग्राफर राज मोहनने हा व्हिडीओ बनवला आहे. उडुपी रेल्वे निसर्गाच्या कुशीतून कसा प्रवास करते, याची सुंदर आणि मोहक दृष्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून मोहनने टिपली आहेत. मोठ मोठ्या डोंगर कड्यावरून आणि हिरव्यागार झाडीतून ही रेल्वे लाईन गेली असल्याचं सुंदर चित्र कॅमेरात टिपण्यात आलं आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “अप्रतिम….शब्दांच्या पलीकडचं..” दुसरा नेटकरी म्हणाला, “भारताच्या पश्चिम घाटातील माणसंही सुंदर आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकपासून ते केरळपर्यंत राहणारी माणसं सुंदर आहेत. त्या ठिकणी राहणारी माणसं हिंदी, कन्नड, केरळ आणि मराठी सिनेमात काम करतात.”