Girl Fell Down In The Sea Viral Video : कधी कधी अचानक अशा काही घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यांचे व्हिडीओ पाहून अनेकांना धडकीच भरते. कारण निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका तरुणीच्या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एक तरुणी समुद्र पाहण्यासाठी डोंगरावर जाते. पण डोंगरावर चढल्यानंतर तिचा पाय घसरतो आणि ती थेट समुद्रातच पडते. डोंगरावरून निसर्ग पाहण्याचा मोह तरुणीच्या अंगलट आल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या तरुणीने स्वत:चा जीव धोक्यात टाकला. तरुणीची डोंगरावरून घसरगुंडी झाल्याची थरारक दृष्य कॅमेरा कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अचानक तरुणीचा पाय घसरला अन्…

तरुणी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी डोंगरावर गेली. तिला जराही अंदाज नव्हता की तिच्यासोबत धक्कादायक घटना घडणार आहे. समुद्र पाहण्यासाठी डोंगरावर जाणं तिला चांगलच महागात पडलं. कारण डोंगरावरून तोल गेल्याने ती थेट समुद्रातच पडली. समुद्र पाहण्यासाठी डोंगरावर गेलेल्या तरुणीची फजिती झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तरुणीचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ renanlife नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्यूज मिळाले असून हजारोंच्या संख्येत लाईक्सही मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

नक्की वाचा – Video : सिंहिण अन् बिबट्यात WWE चा थरार, सिंहिणीने उचलबांगडी केल्यावर बिबट्या चढला झाडावर, पण…

इथे पाहा व्हिडीओ

अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. पण या तरुणीच्या व्हिडीओनं अनेकांना सतर्क केलं आहे. निसर्गाचे नियम मोडल्यावर काय घडतं, याचं एक जबरदस्त उदाहरण या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. डोंगरावर गेल्यानंतर अतिघाई केल्याने तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट समुद्रात पडली. ही धक्कादायक दृष्ये कॅमेरात कैद झाली अन् व्हिडीओ व्हायरल झाला. पण हा व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करणारा नाहीय. तर प्रत्येकाने यातून एक चांगला बोध घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन जंगलात किंवा इतर ठिकाणी असल्यावर निसर्गाच्या नियमांचे पालन करता येईल आणि अशा धक्कादायक घटना घडणार नाहीत.

Story img Loader