Crocodile viral video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एका तरुणीनं चक्क जिवंत मगरीची बॉडी मसाज करण्याचा नाद केला. इंटरनेटवर कवडीमोल प्रसिद्धी मिळवण्यासाठी हल्लीची तरुण पिढी लाखमोलाचा जीव धोक्यात टाकत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून दिसत आहे. अशाच प्रकारच्या एका व्हिडीओनं सर्वांना धक्का दिला आहे. एका तरुणीनं स्वत:चा जीव धोक्यात टाकून मगरीची मसाज केली. हा थक्का करणारा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीला वेड लागलंय की काय? अशा प्रकारचं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मगरीने माणसांची शिकार केल्याच्या घटनाही याआधी उघडकीस आल्या आहेत. असं असतानाही काही व्यक्ती मगरीसोबत खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. मगरी तिच्या धारदार दातांनी प्राण्यांवर हल्ला करते आणि त्यांचा मांस खात असते. त्यामुळेच माणसालाही मगरीजवळ जायला भीती वाटते. पण एका तरुणीने जराही न डगमगता मगरीची बॉडी मसाज केली. ही थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मगरीच्या वेशात एका तरुणाने जिवंत मगरीची छेडछाड करण्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नक्की वाचा – भन्नाट! ‘बेशरम रंग’ गाण्यात तरुणीने भरला नवा रंग, बोल्ड डान्सचा video तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, ” हिच्यापुढं दीपिका फेल”

इथे पाहा व्हिडीओ

तरुणीनं केलेल्या बॉडी मसाजचा मगर पुरेपूर आनंद लुटताना या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला पाहून नक्कीच तुमचं डोकंही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ खूप खतरनाक आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्का बसला आहे. @TheFigen नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 108.3 k व्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओला व्यूज मिळण्यासोबतच शेअरही केलं जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत.