Beautiful Girl In Metro Video Clip Viral : देशाची राजधानी दिल्लीत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये दररोज काही ना काही घटना घडत असतात. दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. एका तरुणाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. तसंच एका तरुणीने भर मेट्रोत बोल्ड डान्स करून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला होता. आताही अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून प्रवाशांना नेहमीच सूचना दिल्या जातात. पण काही प्रवासी भन्नाट कृत्य करून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करतात. आताही एका तरुणीने मेट्रोतच केसांची स्ट्रेटनिंग केल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हसना जरुरी हे या ट्वीटर अकाऊंटवर या तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तरुणीने केसांना स्ट्रेंटनिंग करून कोचमध्ये असलेल्या प्रवाशांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तरुणीच्या अशा वागण्याला विरोध दर्शवला आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एका यूजरने कमेंट करत म्हटलं, ‘दिल्ली मेट्रोची गोष्टच वेगळी आहे.’ या व्हिडीओला ५८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नक्की वाचा – Video : शेतकऱ्याचा नादच खुळा! भन्नाट जुगाड करून ट्रॅक्टरमध्ये भरले टॉमटो, शास्त्रज्ञांनाही अशी कप्लना सुचली नसेल

इथे पाहा व्हिडीओ

एका नेटकऱ्याने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘ही मेट्रो आहे, तुझं घर नाही’. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘पुढच्या वेळी लॉण्ड्री मशिन घेऊन ये आणि मेट्रोला स्वच्छ करून टाक.’ तरुणीने मेट्रोला घर समजून मेकअप करण्याचा प्रयत्न केला. पण हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी या तरुणीला धारेवर धरलं. प्रवास करताना इतरांना त्रास होणार नाही किंवा त्यांचं लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful girl straightening her hair inside delhi metro netizens slams a commuter saying this is metro not your home watch viral video nss