‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना असतो’, असं म्हटले जाते. लहानपणी शाळेत असताना आपले पालक आणि शिक्षक आपल्याला वारंवार सुवाच्च अक्षर लिहा असे सांगत असे जेणेकरून आपलं हस्ताक्षर सुधारेल. ‘हस्ताक्षर चांगले असावे कारण ते दिसायला सुंदर दिसते पण जर सुवाच्च अक्षरामध्ये लेखन केल्यास ते वाचता येते, समजून घेता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना परिक्षेत चांगले गुणही मिळतात. वकृत्व, अभिनय इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर लिहणे ही देखील एक कला आहे. मोत्यासारखे, वळणदार असावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात फार कमी लोकांचे हस्ताक्षर चांगले असते. सध्याच्या डिजिटल युगात पाटी,पेन्सिल, पेनचा वापर कमी झला आहे त्यामुळे सुंदर हस्ताक्षराचं महत्त्व फार कमी झाला आहे. असे असले तरी कधी ना कधी कागद पेन घेऊन लिहिण्याची वेळ प्रत्येकावर येते. अजुनही शाळा कॉलेजमध्ये कागद पेनचा वापर केला जातो. अशावेळी तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो. दरम्यान एका दुसरीतील विदर्यार्थिनीने आपल्या मोत्यासारख्या अक्षरांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा अक्षर चर्चेचा विषय ठरतो आहे. या चिमुकलीचे अक्षर इतके सुंदर आहे की तुम्ही पाहातच राहाल.

येथे पाहा व्हिडीओ

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sun ukhana sasu sun ukhana Funny video viral on social media
“दातात दात बत्तीस दात…”, सुनेचा सासूसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Prank Call Viral Video
‘आईशप्पश.. हाच तो, मुलीचा आवाज काढून मुलांना फसवणारा मुलगा…’ अनोळखी पुरुषाबरोबरच्या गप्पा ऐकून हसाल पोट धरून; पाहा मजेशीर VIDEO
MTV republic day ad goes viral on asking important question of little boy and mother
“भारत देश इतका चांगला, मग ताईला…”, चिमुकल्याच्या प्रश्नावर आईचं उत्तर एकदा ऐकाच! प्रजासत्ताक दिनाच्या ‘या’ जाहिरातीने जिंकलं लोकांचं मन
funny Republic Day Speech
Video : “२६ जानेवारी २५ जानेवारी नंतर येतो” चिमुकल्याच्या भाषणाने केला एकच दंगा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल

हेही वाचा – थरारक! भरपावसात चालत्या कारवर अचानक कोसळला विजेचा खांब, थोडक्यात बचावले प्रवासी, Video Viral

इंस्टाग्रामवर lahuborate नावाच्या खात्यावर या चिमुकलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. चिमुकली जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असून तिचे हस्ताक्षर चर्चेच विषय ठरत आहे. चिमुकली दुहेरी रेषा असलेल्या वहीमध्ये शाईचा पेन वापरून लेखन करताना दिसत आहे. या मुलीचे अक्षर खरचं खूप सुंदर आहे. तिने लिहिलेले प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द हा वळणदार आहे. तिने मोठ्या अक्षरात लेखन केले असून संपूर्ण एकेरी रेष वापरली आहे. एक रेष सोडून पुढच्या रेषेमध्ये लेखन करत आहे. प्रत्येक शब्द सुटसुटीत पद्धतीने लिहिले आहे. हे हस्ताक्षर पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एखाद्याचे हस्ताक्षर इतके सुंदर कसे असू शकते असा प्रश्न तुम्हाला पडेल. नेटकऱ्यांना चिमुकलीचा व्हिडीओ खूप आवडला आहे. नेटकऱ्यांची तिचे तोंडभरून कौतूक केले आहे.

हेही वाचा – “वंदे भारतमध्ये फ्री शॉवर!”, सर्व सीट झाले ओले, ट्रेनमध्ये झाले पाणीच पाणी, संतापलेल्या प्रवाशांनी शेअर केला Video

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले, “खूप छान अक्षर आहे बाळा.” दुसरा म्हणाला, “मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे हे”तिसरा म्हणाला, “या चिमुकलीचे करावे तितके कौतुक कमी आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुला”

Story img Loader