‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना असतो’, असं म्हटले जाते. लहानपणी शाळेत असताना आपले पालक आणि शिक्षक आपल्याला वारंवार सुवाच्च अक्षर लिहा असे सांगत असे जेणेकरून आपलं हस्ताक्षर सुधारेल. ‘हस्ताक्षर चांगले असावे कारण ते दिसायला सुंदर दिसते पण जर सुवाच्च अक्षरामध्ये लेखन केल्यास ते वाचता येते, समजून घेता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना परिक्षेत चांगले गुणही मिळतात. वकृत्व, अभिनय इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर लिहणे ही देखील एक कला आहे. मोत्यासारखे, वळणदार असावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात फार कमी लोकांचे हस्ताक्षर चांगले असते. सध्याच्या डिजिटल युगात पाटी,पेन्सिल, पेनचा वापर कमी झला आहे त्यामुळे सुंदर हस्ताक्षराचं महत्त्व फार कमी झाला आहे. असे असले तरी कधी ना कधी कागद पेन घेऊन लिहिण्याची वेळ प्रत्येकावर येते. अजुनही शाळा कॉलेजमध्ये कागद पेनचा वापर केला जातो. अशावेळी तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो. दरम्यान एका दुसरीतील विदर्यार्थिनीने आपल्या मोत्यासारख्या अक्षरांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा अक्षर चर्चेचा विषय ठरतो आहे. या चिमुकलीचे अक्षर इतके सुंदर आहे की तुम्ही पाहातच राहाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा