नुकताच देशभरात श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कृष्ण जन्मोत्सवाचे आणि दहीहंडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी राधा-कृष्णची वेशभूषा परिधान करून नृत्य करताना दिसते तर कोणी लाडक्या कृष्णाचे सुंदर चित्र रेखाटताना दिसले. सध्या अशाच एका श्री कृष्णाच्या चित्राची सोशल मीडियावर चर्चा होत आहे, विशेष म्हणजे हे चित्र कोऱ्या कागदावर नव्हे तर चक्क २० रुपयांच्या नोटवर रेखाटले आहे. कलाकारची कला पाहून नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे.
२० रुपयांच्या नोटवर रेखाटले कृष्णाचे चित्र
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारे तुम्ही २० रुपयांच्या नोटवर कृष्णाचे चित्र रेखाटले आहे. सर्व प्रथम कलाकाराने २० रुपयांची नोट एका लाकडी फळीव छोटेसे चिकटपट्टीचे तुकडे लावून चिटकवली. कागदावर चित्र काढतानाही ही ट्रिक वापरली जाते जेणेकरून कागद हलणार नाही आणि व्यवस्थित चित्र काढता येईल.
हेही वाचा – अती घाई संकटात नेई! धावत धावत लोकल पकडताना घसरला माय-लेकराचा पाय, थरारक घटनेचा Video Viral
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
त्यानंतर २० रूपयांच्या नोटवर जिथे पांढरा रंग लावला आणि तो सुकल्यानंतर त्यावर पेनाने कृष्णाचे चित्र काढले आणि नंतर त्यात रंग भरले. कलाकाराने हळुवारपणे हे सर्वकाही केले आहे. कलाकाराने नोटवर कृष्णाचे अप्रतिम चित्र साकारले आहे. नेटकऱ्यांनी कलाकाराच्या कौशल्याची आणि कलेचे त्यासाठी कौतूक केले पण त्याचबरोबर काहींनी नोटवर असे चित्र काढू नये असा सल्ला देखील दिला.
हेही वाचा –“जिंकलंस भावा!”, ‘मुकाबला मुकाबला’ गाण्यावर अफालतून नाचतेय ‘ही’ व्यक्ती! थेट प्रभु देवाला दिली टक्कर
नेटकऱ्यांचे जिंकले मन
इंस्टाग्रामवर portrait_makers आणि as_onepencil नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “कृष्ण कान्हिया, हा भारतीय रुपयांचा अनादर करण्याचा प्रयत्न नाही. केवळ सजावटीसाठी नोट वापरली आहे, कृपया द्वेष व्यक्त करू नका”
व्हिडीओवर कमेंट करत काहींनी २० रुपयाच्या नोटची किंमत कृष्ण भक्ताच्या नजरे वाढली आहे असे सांगितले. एकाने लिहिले आता फक्त “२० रुपये नाही तर २,००००,००० रुपये इतकी झाली आहे”
दुसरा म्हणाला, “ही नोट आता अमूल्य आहे, जय श्री कृष्ण”
हेही वाचा – “लालपरी नव्हे ही तर….”, Viral Video पाहून तुम्हीही कराल कलाकाराचे तोंडभरून कौतुक
काहींनी मला ही नोट हवी आहे असेही म्हटले.