Viral Video Rainbow Cloud: निसर्गाहुन मोठा कलाकार नाही असं म्हणायला भाग पाडेल असा एक अत्यंत सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चमत्काराहून अधिक काहीसं एक दृश्य नुकतंच चीनच्या हैनान प्रोव्हिन्स मध्ये हायको या शहरात पाहायला मिळालं. आजवर आपण अनेकदा ढगांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असतील, पाहिले असतील. निळ्याशार आकाशात सूर्यास्ताच्या वेळी पसरणाऱ्या रंगछटा कोणाचाही ताण-तणाव दूर करू शकतात. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा सूर्याची हलकीशी तिरपी पाण्याच्या थेंबांसह मिळून इंद्रधनुष्याचा मोहक रंग आकाशात पसरवते तो क्षण शब्दांपलीकडे सुंदर असतो. चीन मधून व्हायरल होणारा व्हिडीओ सुद्धा अशाच एका इंद्रधनुष्याचा आहे पण खास गोष्टी अशी की यात पूर्ण ढग हा इंद्रधनुष्याच्या रंगात रंगला आहे.

@Earthlings10m या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की. इंद्रधनुष्याच्या रंगाच्या अगदी स्पष्ट छटा दिसत आहेत. गोल पसरलेला ढग पाहून या शहरातील नागरिक स्तब्ध झाले होते आणि अशीच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिलेल्या प्रत्येकाने दिली आहे.

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून जर मी हे खऱ्या आयुष्यात पाहिले तर मी भरून पावेन असे म्हंटले आहे. तर काहींनी जणू काही ढंगाने सुंदर इंद्रधनुष्याला जन्म दिला आहे असे वाटत असल्याचे म्हंटलेय. (..अन पाण्याच्या पंपातून ड्रॅगनसारख्या आगीच्या ज्वाळा उसळल्या, थरारक Video झाला Viral)

इंद्रधनुष्याचा ढग Viral Video

Crocodile Galloping: मगरीला उड्या मारताना कधी पाहिले आहे का? हा व्हिडीओ एकदा बघाच

दरम्यान हा प्रकार घडला कसा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? या दृच्छिक इंद्रधनुष्याला स्कार्फ ढग किंवा ‘पाइलस’ म्हणतात. जेव्हा क्यूम्युलिफॉर्म च्या सभोवताली हवेचा दाब वेगाने वाढतो तेव्हा ती हवा दवबिंदूवर आदळते व गोलाकार आकाराचे ढग बनतात. यातून सूर्याचा प्रकाश जेव्हा पसरतो तेव्हा अशा प्रकारचा इंद्रधनुष्य रंग दिसून येतो. हे दृश्य कितीही सुंदर असले तरी ते हवामानातील बिघाडाचे प्रतीक आहेत.

Story img Loader