‘त्या दोघांचा व्हायरल होणारा फोटो प्रत्येकाला विचार करायला भाग पाडत आहे. लोकांच्या दृष्टीने ती सुंदर नाही, पण तरीही असं काय होतं की या दोघांचं प्रेम फुलत गेलं हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाची आहे. प्रेम फक्त सुंदर चेहऱ्याच्या व्यक्तीवरच करायचं असतं ही खुळचट समजूत या दोघांनी धुळीला मिळवली आणि प्रेमाची खरी व्याख्या काय असते ते या दोघांनी जगाला दाखवून दिलं. म्हणूनच जयप्रकाश आणि सुनिता या दोघांची प्रेमकहाणी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाळेत असताना जयप्रकाश सुनिताच्या प्रेमात पडला. पहिल्याच नजरेत त्याला ती भावली. आपल्या आयुष्याची जोडीदार असावी तर अशी हा विचार त्याच्या मनात पक्का होता. पण अल्लड वय ते. एका मुलाला सुनितासोबत बोलताना पाहून जय रुसला. पुन्हा कधीही सुनीताशी बोलायचं नाही हे त्याने मनात पक्कं केलं. शाळा संपल्यानंतर सुनिताही कायमची बंगळुरूला निघून गेली. ही गोष्ट होती २००४ ची. त्यानंतर तीन वर्षांनी सुनिता जयप्रकाशच्या आयुष्यात पुन्हा परतली.

वाचा : देवीसाठी साडेसहा कोटींची डिझायनर साडी; तिही सोन्याची

जयप्रकाशच्या वाढदिवसादिवशी तिने त्याला फोन केला. दोघांमध्ये झालेल्या गोड संवादानंतर त्यांच्यातल्या तुटलेल्या मैत्रीचं नातं पुन्हा जोडलं गेलं. पुढचे काही महिने ते दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. सारं काही सुरळीत सुरू होतं. दोघांमधलं प्रेमही अलगद फुलत होतं. पण या दोघांच्याही आयुष्यात दुर्दैवी घटना घडली. २०११ मध्ये सुनिताला भीषण अपघात झाला या अपघातातून ती थोडक्यात बचावली, पण तिचा चेहरा मात्र कायमचा विद्रुप झाला. ज्या मुलीला पाहताक्षणी आपण प्रेमात पडलो होतो ती हिच मुलगी आहे यावर जयचा विश्वासच बसत नव्हता. पण फक्त चेहरा विद्रुप झाला म्हणून सुनिताची साथ सोडणं जयप्रकाशला पटलं नाही.

म्हणूनच अनेकांचा विरोध असूनही जयप्रकाशने सुनिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयप्रकाशची आर्थिक बाजू बेतातीच होती. त्यामुळे लग्न न करण्याचा सल्ला कुटुंबियांनी दिला. इतकंच नाही तर होणारी मुलंही सुनितासारखी विद्रुप होतील अशाही टीका केली. पण लोकांच्या वायफळ सल्ल्यांना भीक न घालता त्या दोघांनी लग्न केलं आणि आज दोघांनाही दोन गोंडस मुलं आहेत.

Viral : तिने केली नवऱ्याच्या डोक्याची ‘मंडई’!