Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आपण भावुक होतो तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यातून पाणी येते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक चिमुकला तृतीयपंथी महिलेजवळ जातो आणि तिला मिठी मारतो, त्यावर ती काय प्रतिक्रिया देते, हे एकदा पाहाच. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही लोकल ट्रेनमध्ये अनेक तृतीयपंथी महिलांना पाहिले असेल. अशीच एक तृतीयपंथी महिला मेट्रोमध्ये उभी असते. तितक्यात तिच्या मागून एक चिमुकला येतो आणि तिला मिठी मारतो. चिमुकल्याने मिठी मारलेली पाहून तृतीयपंथी महिला सुद्धा थक्क होते आणि ती भावुक होताना दिसते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ती चिमुकल्याला जवळ घेते आणि हसऱ्या चेहऱ्याने तिथे बसलेल्यांपैकी एकाला विचारते की हा तुमचा मुलगा आहे का? त्यानंतर ती अत्यंत आनंदाने या चिमुकल्याचा लाड करते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याला पुन्हा मिठी मारते. तिच्या साडीच्या पदराने त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. या तृतीयपंथी महिलेचा आनंद गगनात मावेनासा असतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

piyushh_reels या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ते सुद्धा माणसं आहेत, त्यांचा आदर करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ती किती खूश झाली” तर एका युजरने लिहिलेय, “तिच्या चेहऱ्यावरील हसू सर्वकाही सांगत होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “इंटरनेटवरील सर्वात सुंदर रील आहे ही” एका युजरने लिहिलेय, “या मुलाच्या पालकाला आणि त्यांच्या शिकवणीला सलाम” तर एक युजर लिहितो, “व्हिडीओ पाहून रडू आले.. खूप सुंदर व्हिडीओ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. दिड लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.