Old couple Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये उतारवयात आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे. यावेळी एका व्हिडीओतून आजी – आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे.

आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिप्सचा आहे. परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाचं ही वेगळी होती. डोळ्यातलं प्रेम, पत्रातून लिहिलेल्या भावना, नात्यातला आगळा गोडवा इत्यादी. आता मात्र डेटिंग अॅप्स, चॅटिंग, पॉर्न अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत. बदलल्या आहेत. परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि रूजलेलं आहे. आजही तरूणपिढीला यातून प्रेरणा मिळते आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा आपल्या थकलेल्या पत्नीचे केस बांधत आहेत. खूप छोटी गोष्ट आहे मात्र म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीतच मोठा आनंद असतो. आजोबा केस विचंरताना झालेला आनंद आजीच्या चेहऱ्यावरुन आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे.

Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Adorable video of elderly couple dancing to Punjabi song Kala Sha Kala goes viral
“काला शा काला”, पंजाबी गाण्यावर थिरकले आजी-आजोबा; मनमोहक व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त; आजी लाजल्या अन्…, पाहा Viral Video
Jeetendra Rakesh Roshan dance on Naino Mein Sapna video
Video: जितेंद्र ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले, तर लेक एकता कपूरचा ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स
a old man dance in the village on Tumha Baghun Tol Maza Gela marathi song video goes viral on social media trending
“तुम्हा बघून तोल माझा गेला” गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही”
Couple Dance On Gulabi Sadi Song
VIRAL VIDEO : “गुलाबी साडी अन् लाली लाल लाल…” वय साठीपार; पण आजी-आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही थिरकायला लागाल
an old man proposed his wife
“आमचं आय लव्ह यू आहेच पहिल्यापासून..” आजोबांनी केलं आज्जीला प्रपोज, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापाचं काळीज! मुलाला थंडीपासून वाचवण्यासाठी वडिलांची धडपड, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

आजी-आजोबांचा व्हिडिओ इस्टाग्रामवरील @abhaygiri21 या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं. प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दांनी तर कधी स्पर्शांनी तर कधी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना सांगितले जातात. म्हणतात उतारवयात खरी प्रेमाची परिभाषा कळते. त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदाराची खास गरज असते. उतारवयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ, सुंदर आणि परीपूर्ण असतं. या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं…

Story img Loader