Viral Video : मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे. मैत्री मग बालपणीची असो तरुण वयातली असो किंवा म्हातारपणातली, ती नेहमी खास असते. सोशल मीडियावर मैत्रीवर आधारित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. एवढेच काय तर काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी सुद्धा येते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच वृद्ध मित्र नदीकिनारी निवांत बसलेले दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांचे मित्र किंवा मित्रांचा ग्रुप आठवेल. (Beautiful Video of elderly friends sitting together and chatting friendship in old age)
वृद्ध मित्रांचा सुंदर VIDEO व्हायरल (Beautiful Video of elderly friends)
असं म्हणतात, मैत्री ही मरेपर्यंत पर्यंत टिकावी. म्हातारपणात मैत्रीची सर्वात जास्त आवश्यकता असते, कारण त्या वयात सर्वात जास्त एकटेपणा जाणवतो. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच नशीबवान वृद्ध मित्र दिसेल. त्यांची मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल.
या वायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच मित्र नदीकिनारी निवांत बसलेले दिसेल. ते एकमेकांशी निवांत गप्पा मारताना दिसत आहे. वृद्ध वयात त्यांना मैत्री जपताना पाहून तुम्हीही भावूक व्हाल. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील गोरखपुर या शहरातील आहे.
हेही वाचा : “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
total_gorakhpur53 इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओ वर लिहिलेय “खूप दिवस झाले मित्रांनो, एकत्र बसून..”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला” तर एका युजरने लिहिलेय, “गोरखपूरचा हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात हेच सुख पाहिजे.” एक युजर लिहितो, “मी याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे.” तर एक युजर लिहितो. “नशीबवान असतात लोक ज्यांना असे मित्र भेटतात जे म्हातारपणात साथ देतात.” अनेक युजर्स हा व्हिडिओ पाहून भावूक झाले. काही युजर्सनी या व्हिडिओवर हार्टची इमोजी शेअर केले आहेत.