Emotional video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताता, यातले बहुतांश व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ खूप भावूक करणारे असतात.असे व्हिडिओ हृदयाला स्पर्श करतता. १९४७ साली झालेल्या फाळणीमुळे दोन दोशच वेगळे झाले नाही तर अनेक लोकांना त्यांच्या कुटुंबापासून देखील दूर केले.परंतु, आता कर्तारपूर कॉरिडॉरवर कुटुंबापासून दूर गेलेले लोक भेटत आहेत. दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील लोकांच्या भेटीगाठी अनेकवेळा होत आहेत. ही वेदना अशी होती की आजपर्यंत लोक ती विसरू शकलेले नाहीत. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे अनेक कुटुंबे एकमेकांपासून विभक्त झाली. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. बरेच मित्र वेगळे झाले. अशाच एका दुरावलेल्या मित्रांची तब्बल ३५ वर्षांनी भेट झालीये. त्यांची ही कहाणी लोकांच्या मनाला भिडणारी आहे. या दोन मित्रांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. कुठल्या नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ मैत्रीत असते. म्हणूनच कितीही दुरावा आला तरी मैत्रीतील ओढ संपत नाही. याचंच एक उदाहरण समोर आलंय. वयाच्या १२ व्या वर्षी फाळणीमुळे वेगळे झालेले मित्र आता भेटले आहेत. दोन्ही मित्र गुजरातमध्ये एकत्र वाढले होते आणि देशाच्या फाळणीच्या वेळी एकमेकांपासून वेगळे झाले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ९० वर्षांचे हे दोघे मित्र इतक्या वर्षांनी भेटल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. दोघांनीही एकमेकांना मिठी मारुन अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! हायवेवर भरधाव वेगात ३ वर्षांच्या चिमुकल्याने चालवली बाईक; थरारक VIDEO व्हायरल
इतक्या वर्षांनंतर एकमेकांना पाहून या दोघांनीही आपल्या या भेटीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. इतक्या वर्षांनंतर एकमेकांना पाहून या दोघांनीही आपल्या या भेटीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ब्राउनहिस्ट्री नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहेत.