तुम्ही अनेकदाआजूबाजूच्या परिसरात, झाडावर किंवा एखाद्या इमारतीला लटकलेले मधमाश्यांचे पोळे नक्की पाहिले असेल, पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यापासून छातीपर्यंत मधमाशांनी पोळे बांधलं आहे. हे सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या दाढीपासून छातीपर्यंत मधमाशांनी पोळे तयार केलं आहे. एखाद्या भागात मधमाशां दिसल्या तरी तेथील लोक लपून बसतात. एवढी दहशत मधमाशांची असते. शिवाय एखाद्या मधमाशीने हल्ला केला तर आपले संपूर्ण शरीर फुगते. अशा परिस्थितीत या तरुणाला मधमाश्यांची भीती वाटत नाही का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
व्हिडीओ पाहून धक्का बसेल –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण विचित्र अवस्थेत दिसत आहे. या तरुणाच्या चेहऱ्यावर जे दिसते ते तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहे. हा कारण या व्हिडीओतील तरुणाच्या चेहऱ्यापासून छातीपर्यंत मधमाशांनी पोळे बनवलं आहे. शिवाय त्याच्या शरीरावर इतरत्र विखुरलेल्या मधमाशाही दिसत आहेत.
हेही पाहा- समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमधून फोटोग्राफरने कैद केला ‘जलदेवी’चा चेहरा, Viral फोटो पाहून व्हाल थक्क
हा व्हिडिओ canadian_apiary नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तर तो हजारो लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलें की, या तरुणाला कोणता पुरस्कार द्यावा. तर आणखी एकाने या तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय असलं कृत्य फक्त वेडे लोकच करू शकतात असंही काहींनी म्हटलं आहे.