SSC EXAM 2024: राज्यात शुक्रवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षांमध्ये दरवर्षी पेपर फुटण्याचे किंवा कॉपी केल्याचे प्रकार पुढे येत असतात. विद्यार्थ्यांना माेठ्या धाडसाने काही मुलं काॅपी पूरविण्यासाठी धडपड करीत असतात. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. असं असलं तरी दहावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांच्या बाहेरुन कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे.
दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
बीड शहरातील चंपावती महाविद्यालयात दहावीचा पेपर सुरू असताना कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहायला मिळाली. एवढेच नाही तर भिंतीवरून, खिडकिवरून कॉपी पुरवण्यासाठीचां खटाटोप सुरु होता. चक्क परीक्षा केद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कॉपी पुरवण्यासाठी आल्याचा संशय पोलिसांना येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली यावेळी दोन मोठे पेपर त्याच्या खिशातून सापडले. यावेळी पोलिसांनी काठीनं मारलं असता तो व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. या व्हिडीओमुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुणे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६,०९,४४५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ही परीक्षा एकूण 5 हजार 86 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे.
पाहा व्हिडीओ
अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, कोणी कल्पनाही करू शकत नाही, की कॉपी अशाप्रकारेही केली जाईल. तर इतरही अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.