गोड मध हे सर्वांनात आवडतं मात्र, मधमाशी म्हटलं की त्यांचा डंख आठवून सगळ्यांना त्यांचा भीती वाटते. जितका मध गोड असतो त्याहूनही वेदनादायी त्यांचा डंख असतो. अनेकदा तर मधमाश्यांचं पोळं उठवल्यानंतर त्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका धाडसी तरुणीचा व्हिडीओ पहायला मिळत आहे. ज्यात ही तरूणी चक्क मधमाश्यांचं पोळंच आपल्या हातांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी हलवताना दिसून येतेय.

अनेक लोक काहीतरी आगळं वेगळं करून सर्वांचं लक्ष वेधत असतात. सध्या अशाच एका अतरंगी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधमाश्यांचे पोळे जंगलात झाडांवर किंवा उंच इमारतींवर असल्याचं आपण बघतो. चुकून या पोळ्याला धक्का जरी लागला तरी आसपास असलेल्या सर्वांचंच काही खरं नसतं. पोळे उठवल्यानंतर अनेकांचे जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. एखादं पोळं काढायचं असेल तर संपूर्ण परिसर रिकामा करावा लागतो. लोकांच्या घरातील दारे-खिडक्या बंद कराव्या लागतात. पण यातही काही धडाकेबाज अतरंगी असतात जे अंगावर ओरखंडाही येऊ न देता मोठेमोठे पोळं अगदी सहजपणे हलवतात.

अमेरिकेतल्या टेक्सास इथली एरिका थॉम्पसन हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका टेबलखाली मधमाश्यांनी पोळं केलेलं दिसून येतंय. या पोळ्यातील मधमशांना अगदी हलक्या हाताने एरिका थॉम्पसन काळजीपूर्वक धरून त्यांना एका बॉक्समध्ये ठेवताना दिसून येतेय. व्हिडीओच्या शेवटी थॉम्पसन या संपूर्ण पोळ्याला बॉक्समध्ये यशस्वीरित्या हलवते.

आणखी वाचा : अक्षय कुमारनेही कौतुक केलेल्या ‘त्या’ पोलिसाने उलगडलं रहस्य; नवा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : महाराष्ट्रातील १६ वर्षीय सृष्टी ‘गिनीज बुक’मध्ये; १.६९ सेकंदात केला स्केटिंगमधील भन्नाट विक्रम

या व्हिडीओच्या माध्यमातून तरूणीने मधमाशा संवर्धनाचा संदेश देखील दिलाय. “मधमाशांना वाचवून मला त्यांच्यांशी एक भावनिक नातं तयार झालंय…मी आशा करते की त्यांच्याशी जुळलेलं माझं नातं कामय असंच राहील. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात.” अशी पोस्ट या व्हिडीओसोबत शेअर करण्यात आलीय.

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच टेक्सास बीवर्क्स या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ५.५ लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हाताने उचलेलं मधमाशांचं पोळं पाहून हैराण होत आहेत.

Story img Loader