Viral video: सोशल मीडियाच्या दुनियेत रोज एक अजब आणि अजब व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोकं पकडलं असेल आणि अशी कृत्ये करण्याची काय गरज होती असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल. कारण एक महिलेनं चक्क मधमाशांच्या पोळ्यातलं मध काढलं आहे. ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जे हाल केले आहेत हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इन्स्टाग्रामवरील bilal.ahm4d या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत.
खरं तर, या व्हिडिओमध्ये एक महिला मधमाशाच्या पोळ्यातील मध खाताना दिसत आहे. सहसा लोक पॅकबंद बॉक्समधून मध काढल्यानंतर खातात. पण या महिलेला माहित नव्हते की तिने थेट मधमाशाच्या पोळ्यातून मध खाण्यास सुरुवात केली. मधमाशी चावल्यामुळे महिलेचे तोंड सुजल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा उजवा ओठ आणि उजवा डोळाही सुजला आहे. एकूणच या महिलेचा संपूर्ण चेहराच बिघडला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे मधमाश्या चावल्यानंतरही ही महिला शांतपणे पोळ्यातील मध खात आहे. आजूबाजूला अनेक मधमाश्या येत आहेत, मात्र याने त्याला काही फरक पडत नाही. या महिलेला मधमाश्या चावूनही ती अगदी बिंधास्तपणे मध खात आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: धावती लोकल बनली कुस्तीचा आखाडा! दोन प्रवाशांमध्ये लोकलच्या दरवाजातच तुफान हाणामारी, एक चूक अन्…
नेटकऱ्यांनी सांगितलं फिल्टरचं कारण
अनेक युजर्सनी या व्हिडिओतील महिलेच्या विकृत चेहऱ्याला फिल्टर असल्याचा आरोप केला आहे तर व्हिडीओ खोटा असल्याचंही म्हंटलं आहे. एका युजरने म्हटले की, ‘महिलेने फिल्टर वापरला आहे. मधमाश्या पहा. त्या अजिबात खऱ्या वाटत नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘महिलेच्या अर्ध्या चेहऱ्यावर फिल्टर आहे.’