Assembly Election Result 2023 : देशातील चार राज्यांमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या विधानसभा निवडणुकांमधील मतदारांचा कौल हाती येत आहे. त्यानुसार चारपैकी तीन राज्यांत भाजपा आघाडीवर आहे तर एका राज्यात काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. तसंच, आतापर्यंतच्या अपडेटनुसार काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. परंतु अजूनही मतमोजणी सुरू आहे. तर मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा कल हाती येत असतानाच लोक सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स बनवत असल्याचं पाहायला मिळत आहेत. काही लोक भाजपला समर्थन देतायत तर काही कॉंग्रेसला समर्थन देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही काही लोकांनी राजकीय नेत्यांवर अशी भन्नाट मीम्स बनवली आहेत जे पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं. चला तर पाहूया निकालाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणारी मजेदार मीम्स.

मीम्ससह अनेक पोस्ट इथे व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोणत्या राज्यात कोणता पक्ष सत्तेवर येईल, याची लोका प्रतीक्षा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the final result of the assembly election 2023 the funny memes of the leaders viral netizens cheer on social media jap