Tamhini Ghat Video: लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. तुम्हीही या विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर हा व्हिडीओ एकदा नक्की बघा. ताम्हिणी घाटातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जे गाडी घेऊन या घाटात जाणार आहेत, त्यांनी तर हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.

रविवारी भुशी डॅम्प परिसरात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीतदेखील अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, आता ताम्हिणी घाटातला नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून जे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असतात त्यांच्या बाईक्स अक्षरश: खाली पाडल्या आहेत. घाटात गर्दी झाल्यामुळे उभ्या गाड्या ढकलून कडेला पाडल्याचं दिसत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी लावून घाटातील आनंद लुटायला जाताना हे लक्षात ठेवा, तुमच्या गाड्यांचं नुकसान होऊ शकतं.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

पर्यटन स्थळांवर अपघातांची मालिका

लोणावळा, मावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणच्या धरणामध्ये खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जिवाला धोका होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटनस्थळांवर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. त्या दृष्टीने वन विभागाच्या वतीने किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घातली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हौशेला मोल नाही! पठ्ठ्याने बायकोला थेट बुलडोझरवर बसवून आणलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

ताम्हिणी घाट हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक लोक निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवण्यासाठी ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट देतात. ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता, जो पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव या गावांना जोडतो. पावसाळ्यात टेकड्या हिरवाईने आच्छादलेल्या असतात आणि इथून मुळशी धरणाचे दृश्य अतिशय सुंदर असते. ताम्हिणी घाटातून उंचावरून वाहणारे सुंदर धबधबे पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. येथे वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की, उंचावरून वाहणारे धबधबे उलटे वाहू लागतात. मात्र आज काल पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते.

Story img Loader