बिहारमधल्या मुजफ्फरपुरमध्ये गेल्या काही वर्षांपासून काही मुलांचा रहस्यमयी मृत्यू होत आहे. २०१४ मध्येच या रोगापासून १२२ मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे हेच कळायला मार्ग नाही. स्थानिक लोक या रोगाला ‘चमकी’ नावाने ओळखतात. आता या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. या रहस्यमयी मृत्यूला लिची हे फळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

वाचा : हाच तो बाळासाहेबांचा आवाज!; उद्धव ठाकरेंच्या खणखणीत भाषणानंतर ‘सोशल’ आवाजही बुलंद

बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये लिचीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. या भागातून लिचीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हीच लिची या भागातील मुलांच्या रसहस्यमयी मृत्यूला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. भारत आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे यावर एक संशोधन केले. यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. टाइम ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या संशोधनातून हे समोर आले आहे. आधिच गरिब वस्ती असलेल्या या भागात मुलांना खायला सकस आहार मिळत नाही. ही मुले लिची खाऊन जगतात. अनेक मुले लिची खाऊन उदरनिर्वाह करतात आणि रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने त्यांना हा रोग होतो असे संशोधनात म्हटले आहे. कुपोषित असल्याने आधिच या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यातून उपाशीपोटी लिची फळ खाल्ल्याने शरिरात उर्जेची निर्मिती करणा-या फॅटी अॅसिड आणि ग्लूकोजचे ऑक्सिडिकरण होते. त्यामुळे उपाशी पोटी लिची न खाण्याचा तसेच तिचे अतिसेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वाचा : आनंद महिंद्रा यांच्या ट्विटने झाली त्याची बोलती बंद

बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये लिचीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. १९१४ ते २०१४ या काळात येथे रहस्यमयीरित्या १ हजार मुलांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader