Belgium Girl Married with Indian Auto Driver: प्रेमाला मर्यादा नसते, म्हणूनच आजकाल लोक परदेशी मुलींशीही लग्न करू लागले आहेत. तसे पाहता, भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यवतः दिसून येते. परदेशी मुली पतीसोबत राहायला भारतात आल्याचे क्वचितच पाहायला मिळते, पण असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक परदेशी सून भारतात आली आहे. कर्नाटकातील विजयनगर येथील ऑटो चालकाच्या प्रेमात थेट बेल्जियमची मुलगी पडली आहे. या पट्ट्याने तिच्यासोबत लग्नही उरकले आहे. या मुलीचं नाव कॅमिल असून अनंतराजू असं या ऑटो चालकाचं नाव आहे.
दोघांच्या मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात
३० वर्षीय अनंतराजू हा एका ऑटो चालकासोबत टुरिस्ट गाईड म्हणून काम करत होता आणि ही मुलगी आपल्या कुटुंबासमवेत बेल्जियम येथे राहत होती. वर्ष २०१९ मध्ये कॅमिल आपल्या कुटुंबासह हम्पी, कर्नाटक येथे फिरायला आली होती. मग अनंतराजू त्यांचे मार्गदर्शक बनले. अनंतराजू यांनीच त्यांना कर्नाटकात फिरवून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मुलगी आपल्या देशात गेली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचाही संपर्क आला. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
मंदिरात केले थाटामाटात लग्न
दरम्यान, मुलीने या रिक्षाचालकाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि होकारार्थी उत्तर मिळाले. कॅमिल आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह थेट भारतात पोहोचली. मंदिरात जाऊन तिने थाटामाटात लग्न केले. हा विवाह नुकताच पार पडला.