Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन पक्ष्यांचा हा व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवून जातो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन पक्षी दिसत आहेत; एक कावळा आणि दुसरी घार. तीक्ष्ण डोळे अन् अकाशात उंच घिरट्या घालत एका क्षणात जमिनीवर येऊन भक्ष्यांवर हल्ला करून उचलून नेणारी घार जेव्हा तिच्या कुटुंबावर ही वेळ येते तेव्हा काय करते पाहाच. घरट्यात घारीचं पिल्लू बसलेलं दिसत आहे, यावेळी तिथे कावळा येतो आणि तो घारीला चोचीने मारत आहे. यावेळी घार त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही. घारीचं पिल्लू शांत बसलेलं दिसत आहे. यानंतर कावळा तिथून निघून जातो आणि मोठी घार तिथे येते आणि घरट्यातलं दृश्य पाहून आक्रोश करत आजूबाजूला हे कुणी केलं हे पाहते. तेवढ्यात तिला कावळा दिसतो आणि क्षणात ती कावळ्याकडे झेप घेते आणि कावळ्याला आपल्या चोचीत पकडून उंच आकाशात गिरक्या मारते. कावळ्याला अशाप्रकारे आपल्या कर्माची शिक्षा लगेचच मिळाल्याचं दिसत आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @kandaa_poha या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळते की, दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करू नका, नाहीतर तुमचंही वाईट होईल. एका युजरने म्हटले की, ‘कर्म नेहमीच येते.’ तर दुसरा म्हणाला, ‘पुढच्या वेळी तो अशी चूक करणार नाही.’

Story img Loader