Viral photo: ‘अहो, मी माहेरी जाते आहे’, पत्नीनं असं म्हणताच पती खूश. माहेरी गेल्यानंतर काही दिवसांनी पत्नी माहेरी गेल्याचा आनंद होणाऱ्या पतीलाच घर नकोसं वाटतं. कधी बायको परत येते, असं होतं. किंबहुना ते स्वतःच तिला माहेरी आणायला जातात.नवरा बायको म्हटलं तर भांडणं होणारच. त्या शिवाय संसारात मजा येत नाही असं म्हणतात. पण काही वेळेस हे भांडण कमालिचं वाढतं. अन् बायको नाराज होऊन माहेरी निघून जाते. मग बायकोला घरी परत आणण्यासाठी नवऱ्याच्या माहेरी जाऊन तिची समजूत काढावी लागते. तर कधी कधी बायको थोडा आराम मिळावा किंवा घराच्या लोकांना भेटण्यासाठी माहेरी जाते. अशाच एका रिक्षाचालकानं पत्नी माहेरी गेल्याच्या आनंदात रिक्षामध्ये पोस्टर लावलंय. या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे पोस्टर वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षावर, टॅक्सी किंवा बाईक्सच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तसेच प्रश्नही पडतो की, या लोकांना एवढं भन्नाट लिहायला सुचत कसं… सध्या असाच एका रिक्षामध्ये लावलेल्या कोट्सचा फोटो व्हायरल होत आहे.बेंगळुरू येथील एका ऑटो चालकाने आपली पत्नी माहेरी गेली या आनंदात रिक्षामध्ये भन्नाट पोस्टर लावलं आहे.या पोस्टरवर त्यानं लिहलं की “बायको माहेरी गेली आहे. मी आनंदी आहे”. रिक्षाच्या सीटमागे एक कागदावर त्यानं हे लिहलं आहे.
पाहा फोटो
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा फोटो _epic69 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “वाह, तो त्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे”, दुसरा म्हणाला, “हा आनंद फक्त चार दिवसांचा नंतर तिच्याशिवाय पर्याय नाही” दरम्यान, काही इंस्टाग्राम नेटकऱ्यांनी त्याला व्हायरल केल्याने त्याला त्रास होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. तर आणखी एकानं, “तुम्ही त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले, हा गरीब माणूस आनंदी होता, आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जर त्याच्या पत्नीला हे कळले तर त्याला ऑटोमध्येच झोपावे लागेल”. तिसऱ्याने लिहिले की, “हा नक्कीच पुणेकर असेल” तिसरा म्हणाला, ‘थेट मुद्दा मांडला”