सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ऑटो रिक्षा चालक दुचाकी चालकाला त्रास देताना दिसत आहे. हा व्हिडीओ बेंगळुरूचा असल्याचे सांगण्यात येत आहे ज्यात ऑटो चालक बाईक चालकाचा फोन हिसकावून घेऊन जमिनीवर जारात फेकताना दिसत आहे. या व्हिडीओतील रिक्षा चालकाचे गैरवर्तण पाहून अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर हा व्हिडिओ इंदिरानगर मेट्रो स्टेशनजवळचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिक्षा चालकांच्या गैर वर्तणुकीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता हा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओतील रिक्षा चालक त्याने केलेल्या कृतीचे समर्थन करताना दिसत आहे, तो म्हणतो, “मित्रांनो, रॅपिडोचा अवैध धंदा कसा चालतो ते पहा. हा माणूस दुसऱ्या देशातून आला आहे आणि राजासारखा फिरतोय. ऑटो डिपार्टमेंट किती वाईट झाले आहे आणि त्याला कशी वाईट वागणूक दिली जात आहे हे समजून घेतले पाहिजे. शिवाय तो दुसऱ्या देशातील आहे, त्याच्याकडे व्हाईट बोर्ड असूनही तो मुलीला घ्यायला आला आहे.” ३० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ऑटो चालक आधी बाईक चालकाचा फोन हिसकावून घेतो आणि नंतर त्याला थप्पड मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर, आपल्या कृतीचे समर्थन करत, तो दुचाकी चालकाच्या विरोधात खूप बोलत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- भरधाव रुग्णवाहिकेला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराचा भयंकर अपघात, Video पाहून थरकाप उडेल

हेही पाहा- मंदिर परिसरात नॉनव्हेज ऑर्डर देण्यास नकार, Swiggy ने कामावरुन काढलं; पुजाऱ्यांनी केला सन्मान, नेमकं प्रकरण काय?

व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी घेतली दखल –

या घटनेनंतर दुचाकी चालकाने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी याप्रकरणी ट्विट केले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून याप्रकरणी कठोर आणि आवश्यक ती पावले उचलली जातील. व्हायरल व्हिडिओमधील ऑटोचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिवाय या ऑटोचालकावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.