बंगळुरू हे आयटी हब म्हणून ओळखले जाते,मात्र या शहराला आणखी एका गोष्टीसाठीही विशेष ओळख आहे ती म्हणे येथे कधीही न संपणारे ट्रॅफिक अर्थात वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडी हा बंगुळरूमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाले असून वाहन चालकांना रोजच्या प्रवासात अनेक वेळा तासन्‌तास वाहतूक कोंडीमध्येच घालवावे लागतात. अशा या परिस्थितीत एका रिक्षाचालकाने प्रवाशांच्या वाहतूक कोंडीमध्ये वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.बंगळुरूच्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी या रिक्षाचालकाने हटके जुगाड शोधून काढला आहे ज्याचा फोटो व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटोमध्ये एका रिक्षामध्ये मिनी-लायब्ररी तयार केल्याचे दिसते आहे जी प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत आहे. “व्हाय डिवोर्स?” आणि “गॉड लव्ह्स यू” यांसारख्या पुस्तकांचा खजिना या रिक्षात प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. प्रवाशांना या पुस्तक वाचण्याचा आनंद घ्यावे हे एक फलकही लावण्यात आला आहे,ज्यावर लिहिले आहे, “फ्री फॉर ऑल, टेक इफ यू विश. म्हणजे, “सर्वांसाठी मोफत आहे, तुम्हाला हवे असल्यास बरोबर घेऊन जा”

LinkedIn वापरकर्ता रवीळा लोकेश यांनी या अनोख्या रिक्षाचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या मित्राला ट्रॅफिकमध्ये या ‘लायब्ररी ऑन व्हील्स’चा शोध लागला.

येथे पाहा पोस्ट

https://www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:7267062903504019456/

हेही वाचा –लग्नसोहळ्यात कारच्या सनरुफमध्ये उभे राहून सुरु होती आतशबाजी, पुढच्या क्षणी फटाके…..Viral Video

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले:
“बेंगळुरू स्टाइल!!!! केवळ बेंगळुरूमध्येच जीवनाविषयक सल्ला आणि तत्त्वज्ञानाची शिकवण विनामूल्य मिळू शकते… तेही रिक्षामध्ये! ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या माझ्या मित्राला या मिनी-लायब्ररीचा अनुभव घेता आला. हा रिक्षाचालक रस्त्यांवर गाडी चालवताना प्रवशांसाठी जीवन प्रशिक्षक, समुपदेशक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक बनतो. व्हाय डिवोर्स?’ पासून ‘गॉड लव्ह्स यू’पर्यंत पुस्तके या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत.तुम्ही रोजच्या जीवनात अनुभवलेला सर्वात प्रेरणादायक किंवा अनोखा अनुभव काय आहे? चला, अशा काही गोष्टी जाणून घेऊ या

हेही वाचा – हत्तीला कधी डान्स करताना पाहिले आहे का? भरतनाट्यम करणाऱ्या २ तरुणींबरोबर थिरकला हत्ती, पाहा Viral Video चे काय आहे सत्य?

इंटरनेटवरील लोकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे खूप प्रेरणादायक आहे!”

“बंगळुरूचे वातावरण जंगली आहेत. जीवनाचे धडे देणारा ऑटो चालक? क्लासिक “