BMTC bus driver Heart Attack: आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. धडधाकट असलेल्या तरुण वयातील लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. मात्र अचानक आलेला हृदयविकाराचा झटका त्या व्यक्तीसह इतरांसाठीही जीवघेणा ठरू शकतो. बंगळुरू महानगर परिवहन मंडळाची बस चालविताना एका चालकाला हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरुच्या यशवंतपूर येथे सोमवारी बस चालवित असताना ही घटना घडली. ३९ वर्षीय चालक किरण नेलमंगला ते यशवंतपूर येथे बस चालत असताना मध्येच त्याच्या छातीत दुखायला लागले आणि तो बेशूद्ध पडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार चालक बस चालवत असतानाच अचानक कोसळताना दिसून येत आहे. यावेळी या बसच्या समोर दुसरी एक बस चालत होती, ज्याला मागून येणाऱ्या बसचा हलकासा धक्का लागला. यामुळे कंडक्टरने तात्काळ चालकाच्या केबिनकडे धाव घेतली आणि बसचा ताबा स्वतःकडे घेतला. चालकाची शूद्ध हरपलेली पाहून कंडक्टरने बसचे नियंत्रण मिळवून ती वेळीच थांबवली आणि पुढील अनर्थ टळला.

Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
donald trump and stormy daniels
Donlad Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पण त्यांच्या आयुष्यात आलेलं पॉर्नस्टार स्ट्रॉमी डॅनियल्सचं प्रकरण काय होतं?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’

यानंतर चालक किरणला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बंगळुरू परिवहन मंडळाने कंटक्टरच्या कृतीचे कौतुक केले आहे. त्याने वेळीच धाव घेऊन परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अपघात टळला.

बंगळुरु परिवहन विभागात काम करणाऱ्या ४५ ते ६० वयोगटातील ७,६३५ कर्मचाऱ्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका आहे. राज्य सरकारच्या जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस या संस्थेने ही तपासणी करून मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अहवाल प्रसिद्ध केला होता.

बंगळुरु परिवहन विभाग आणि सदर संस्थेत झालेल्या सामंज्यस करारामार्फत ही तपासणी करण्यात आली होती. अभ्यासाअंती दिसले की, ५.५ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही महिन्यात आणखी २,५०० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे परिवहन विभागाचे प्रयत्न असणार आहेत. यशवंतपूर येथे घडलेल्या घटनेमुळे आता परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आणखी गांभीर्याने विचार केला जात आहे.

Story img Loader