आई वडीलानंतर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य घडवतात हे शिक्षक. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो, त्यांच्यावर योग्य संस्कार करतो. चांगले वाईट काय ते ओळखण्यास शिकवतो. विद्यार्थ्यांमधील कला गुणांची जाणीव त्यांना करून देतो. चांगले शिक्षक मिळणे यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सुंदर नाते दर्शवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बंगळुरू येथील क्राइस्ट यूनीव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गशिक्षकाबरोबर मस्करी केली आणि त्यावर शिक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून नेटकरी भावूक झाले आहे. त्या आनंददायी क्षणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर केला मजेशीर प्रँक
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, काही विद्यार्थी वर्गामध्ये मारामारी करत आहे. दरम्यान एक शिक्षक घाई घाईने त्या वर्गाच्या दिशेने येतात. वर्गात येताच सर विद्यार्थ्यांना ओरडून शांत बसायला सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शांत राहण्यासाठी समजावत असतानाच अचानक सर्व विद्यार्थी जल्लोष करू लागतात. टाळ्या वाजवतात. शिक्षकांना काही समजणार तेवढ्यात एक मुलगी केक घेऊन तिथे येते तेव्हा शिक्षकांना समजते की त्यांच्याबरोबर प्रँक झाला आहे. विद्यार्थ्यांनी मजेशीर प्रँक करून शिक्षकांचा कॉलेजचा शेवटचा दिवस अत्यंत खास बनवला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे.
मोन्सीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत चार दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “कॉलेजचा शेवटचा दिवस नाट्यमय असला पाहिजे.”
पाहा Viral Video
काय म्हणाले नेटकरी
सोशल मीडिया वापरकर्त्यांना हा क्षण खूप आवडला. “सर खरोखरच एक विचित्र व्यक्ती आहेत,” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “कॉलेजच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी भावनिक क्षण.”
एका वापरकर्त्याने म्हटले, “शिक्षकाने मिळवलेले सर्वात मोठे बक्षीस विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेल्या अतुलनीय प्रेमात असते.”
व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे पण हा केवळ एक विनोद नव्हता, तो एका चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मनापासून दिलेला निरोप होता.