swiggy zomato Porter delivery man : बंगळुरूमध्ये नेहमीच आश्चर्यकारक आणि विचित्र घटना घडत असतात ज्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशाच एका घटनेने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बंगळुरूमधील एका डिलिव्हरली बॉयचा फोटो व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या डिलव्हरी बॉयने युनिफार्म स्विगीचा(Swiggy) घातला आहे पण त्याच्या गाडीवर मात्र झोमॅटोची ( zomato) बॅग दिसत आहे. हा फोटो पाहून सर्वांनाच प्रश्न पडत आहे की, “हा डिलव्हरी बॉय नक्की कोणासाठी काम करतो, स्विगी का झोमॅटो?”
एक्स(ट्विटर) वर Manju @Tanmanaurdhan नावाच्या वापरकर्त्याने हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “म्हणूनच मला बंगळुर आवडते!! हा माझ्यासाठी बंगुळरचा सर्वोत्तम क्षण आहे.” हा फोटो एक मजेदार किस्सा आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर फक्त स्विगी-झोमॅटोच नव्हे तर या फोटोमध्ये आणखी एका स्टार्टअपचा लोगो तुम्हाला दिसेल.
हेही वाचा – Video : काश्मीरच्या सौंदर्याला लागली दृष्ट? यंदा गुलमर्गमध्ये अजूनही बर्फवृष्टी नाही, काय आहे कारण…
डिलिव्हरी बॉयने केली कमाल!
एका डिलिव्हरी बॉयने स्विगीचा लोगो असलेला केशरी शर्ट घातलेला असून त्याच्या गाडीवर झोमॅटोचा लोगो असलेली लाल डिलिव्हरी बॅग ठेवलेली दिसत आहे. एवढंच नाही तर पोर्टरचा (porter) लोगो असलेले हेल्मेटही त्याने परिधान केले आहे. स्विगी, झोमॅटो आणि पोर्टर हे तिन्ही वेगेवगळे स्टार्टअप आहेत जे ग्राहकांना डिलिव्हरीची सेवा देते. तीन वेगवेगळ्या स्टार्टअपचे भन्नाट कॉम्बिनेशन करणारा हा भन्नाट फोटो लोकांना प्रचंड आवडला आहे.
हेही वाचा – तब्बल २० मिनिटे विमानाबाहेर लटकत होता पायलट, तरीही वाचला त्याचा जीव! थरारक अपघाताचा किस्सा व्हायरल
हा फोटो पाहून लक्षात येते की, बंगळुरू एक असे शहर आहे जिथे ट्रॅफिकमधून हसतमुखाने जाणारा डिलिव्हरी बॉय नकळतपणे अनेक ब्रँडला एकत्र बांधतो आहे. ही अशी जागा आहे जिथे स्टार्टअप फक्त एकत्र काम करत नाहीत; कधी कधी ते एकत्र प्रवासही करतात.