उद्योगजगातील नावीन्य यासाठी भारत हा जगातील एक सर्वात्तम देश म्हणून ओळखला जातो. देशात जवळपास अनेक जण कौटुंबिक व्यवसाय करतात. सुरुवातीला कुटुंबातील एक सदस्य व्यवसाय चालू करतो आणि मग पुढची पिढी त्याला हातभार लावते. तुम्ही आतापर्यंत खाद्यपदार्थ किंवा भाजीपाल्याचा स्टॉल, साडी किंवा ड्रेस विकणे आदी अनेक कौटुंबिक व्यवसाय पहिले असतील. पण, आज बंगळुरूमधील एका अश्या कुटुंबाची चर्चा होत आहे, ज्यांचा एक अनोखा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ गेम उपकरणे दुरुस्त करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची (Electronics Repair Shop) एक पोस्ट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूमध्ये एक कुटुंब गेमिंग कन्सोल खेळणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर करते. काही वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेल्या या कन्सोलमध्ये मायक्रोसॉफ्टने उत्तम, असे गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. गेमिंग कन्सोलमधून आपल्याला व्हिडीओ गेम्सचा एक्स्पीरियन्स घेता येतो. तर ही गेमिंग उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बंगळुरूमध्ये एक दुकान आहे. तसेच हे दुकान २४ तास चालू असते. इथे फक्त आणि फक्त व्हिडीओ गेम उपकरणांवर काम केले जाते.

हेही वाचा…स्पीकर बंद झाले तरीही करेल काम…. नवरीच्या डान्ससाठी Ola स्कूटरसह केला देसी जुगाड; पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा :

सोलाना फाऊंडेशनचे डेव्हलपर आयुष हे बंगळुरूमध्ये त्यांचे गेमिंग उपकरण PS5 दुरुस्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पोहचले. तिथे त्यांना समजले की, एक संपूर्ण कुटुंब मिळून हा व्यवसाय करते आहे. तसेच त्यांचे बंगळुरूमध्ये स्वतःचे सात सेंटर आहेत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते त्यांच्या इतर कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षण देत एकत्र व्यवसाय करतात.

आयुष या युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्त करते आहे. तसेच या संपूर्ण दुकानात व्हिडीओ गेमच्या उपकरणांचे अनेक मदरबोर्ड पूर्ण दुकानात लावून ठेवले आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट युजर आयुष्य @heyayushh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि या कुटुंबाच्या अनोख्या व्यवसायाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru family run gaming console repair shop and train family members to work twenty four hours asp
Show comments