बंगळुरू असे शहर आहे जिथे व्यवसाय आणि राजकीय घडमोडींपेक्षा तेथील प्रचंड वाहतूक कोंडी आणि घरमालक-भाडेकरूंच्या किस्से यांमुळेच जास्त चर्चेत असते. घरमालकांनी जास्त भाड्याची मागणी केल्याचे अनुभव अनेक लोक शेअर सोशल मीडियावर करतात. सध्या इंटरनेटवर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका घरमालकाने इंदिरानगरमधील २ बीएचके फ्लॅटचे भाडे काही तासांत १० हजार रुपयांनी वाढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक वाढलेले भाडे इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
X (Twitter) वर @Bharath_MG द्वारे शेअर केलेल्या, ‘भाड्यासाठी उपलब्ध’ असे कॅप्शन असलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट नितीन कालरा यांनी शेअर केले आहेत. फ्लॅटमध्ये मॉर्डन इंटेरिअर डेकोरेशन आणि सुविधा आहेत. विशेष म्हणजे तासाभरात घरमालकाने आपल्या फ्लॅटचे भाडे ४५,००० हजारांवरून ५५,००० हजार करण्याचा निर्णय घेतला. या पोस्टने पटकन इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले.
या पोस्टला २ लाखापेक्षा जास्तवेळा पाहिले आहे आणि कित्येकांनी कमेंट् देखील केल्या आहेत. अनेकांनी बंगळुरूमध्ये घरांचे भाड्याने घेणे कसे परवडणारे नाही हे सांगितले आहे पोस्टवर एकाने कमेंट केली की, ‘खरेतर ही आधुनिक जगात संधीवादाची आणि नैतिकतेच्या अभावा आहे जी दुर्दैवाने मागणी-पुरवठा/व्यावसायिक अर्थाने गौरवली जाईल आणि साजरी केली जाईल!’
हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करताय? पूजा अन् सजावटीच्या साहित्यासाठी पुण्यातील ही ठिकाणे आहेत प्रसिद्ध
दुसर्याने कमेंट केली की, “फक्त वाइब्सवर आधारित फ्लॅटची किंमत अधिक असली पाहिजे. कल्पना करा की, अनेक इंफ्लुएंसर्सचा एक गट त्यांच्या आशयासाठी याचा वापर करत आहेत. स्लो-मो फ्लॅट टूरमुळे इंटरनेट गोंधळ निर्माण केला आहे.” तिसऱ्या सांगितले की, “मला वाटते की, पूर्वी हा चोरीचा सौदा होता, बोली कमी होती. आता ते सामान्य झाले आहे, असा माझा विश्वास आहे.”
चौथ्याने सांगितले, “आता मला समजले आहे की, मित्र आणि नातेवाईकांना बेंगळुरूमध्ये फ्लॅट का खरेदी करायला आवडतात; भुवनेश्वरमध्ये आम्ही खरेदी केलेल्या 1१४१४ स्वेकअर फिटच्या ३ बीएचकेचे भाडे ईएमआयपेक्षा जास्त आहे. ते घरी गेल्यावर ते विकण्याच्या हेतूने बेंगळुरूमध्ये फ्लॅट खरेदी करणे पसंती करतात”
हेही वाचा – पत्नीला झाला कर्करोग, पतीने कापले तिचे केस; दोघेही गळ्यात पडून रडले, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ”प्रेम…”
पाचव्या सदस्यांनी कमेंट केली, “बंगळूरूमध्ये काही वर्षांमध्ये राहण्या लायक असणार नाही. सरकारने हस्तक्षेप करू आणि घरभाड्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
तर काहींनी मजेशीर मीम्स शेअर केल्या आहेत. चला पाहू या मीम्सची एक झलक.
सध्या @Bharath_MG यांनी शेअर केलेली मूळ ‘भाड्याने उपलब्ध’ पोस्ट हटवली गेली आहे असे दिसते. पण एका अपडेटमध्ये, @Bharath_MG ने लिहिले की ”माझ्या भाड्याच्या ट्विटला इतक्या प्रतिसादांची अपेक्षा नव्हती!
भाडे वाढवण्याबद्दल त्यांच्यात थोडा तिरस्कार मिसळून बहुतेक प्रेम होते. त्याबद्दल खरच क्षमस्व! एकदा आम्ही सहमत झालो आणि भाडे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर मी भाडे वाढवणार नाही. अट एवढीच आहे की, मला फ्लॅट परत त्याच स्थितीत हवा आहे ज्या स्थितीत तुम्ही भाड्याने घेताना होता.’