अलीकडे, बेंगळुरूमधील IKEA स्टोअरला भेट देणाऱ्या एका महिलेला एक भयानक अनुभव आला. लोकप्रिय किरकोळ फर्निचर विक्रेत्याच्या फूड कोर्टमध्ये जेवणाचा आनंद होती आणि अचानक छतावरून तिच्या टेबलावर एक मेलेला उंदीर पडला. @Sharanyashettyy या ट्विटर युजरने या घटनेचे धक्कादायक फोटो देखील शेअर केले आहे, ज्यात मेलेला उंदीर त्यांच्या स्नॅक्ससह टेबलवर दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटोसह तिने ट्विटमध्ये तिने आपला अविश्वास व्यक्त केला, “IKEA मधील आमच्या फूड टेबलवर काय पडले याचा अंदाज लावा… मलाही विश्वास बसत नाही. आम्ही स्नॅक्स खात होतो आणि हा उंदीर वरून टेबलावर पडला… आतापर्यंतचा सर्वात विचित्र क्षण!”‘

“हे विचित्र आणि अविश्वसनीय होते. आमच्या आजूबाजूचे सर्वजण जेवत होते आणि टेबलाकडे पाहत होते आणि आम्ही याबद्दल काहीतरी करण्यासाठी कोणीतरी येईल हे शोधत होतो. दोन क्लीनर आणि नंतर एम्बेसी ग्रुपमधील आणखी एका माणसाला बोलावले. त्या व्यक्तीने IKEA मधून दुसर्‍या महिलेला कॉल केला, ज्याने नंतर त्याने आणखी एकाला कॉल केला,” असे तिने ट्विटमध्ये स्पष्ट केले.

हेही वाचा – दिल्लीतील पुराच्या संकाटवर AI ने दिलं उत्तर! भविष्यात राजपथावर दिसतील अशा वॉटर बोटस्! पाहा फोटो

पुढे तिने सांगितले की,”मात्र, मदतीसाठी प्रतिक्षेदरम्यान परिसरात बंदी घालण्यात आली नाही आणि मेलेला उंदीर उघड्यावरच राहिला. तिने हे देखील शेअर केले की, ”आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जवळपासच्या टेबलवरील ग्राहकांनी काहीही घडलेच नसल्यासारखे खाणे चालू ठेवले आणि स्टोअरच्या कर्मचार्‍यांनी परिसराची पुरेशी स्वच्छता करण्यासाठी कोणतीही तत्काळ कारवाई केली नाही.”

“मी तिथे काही गोंधळ केला नाही कारण तेथे बरेच लोक होते आणि त्यामुळे आणखी गोंधळ झाला असता. म्हणून ते काय करतील हे पाहण्यासाठी मी फक्त निघून गेलो आणि त्यांनी जे केले ते भयंकर होते. तेथे कोणतीही यंत्रणा नव्हती. लहान मुले आजूबाजूला आणि त्याच ठिकाणी ठेवलेल्या टेबलावर खात होती,” असे तिने ट्विटमध्ये पुढे सांगितले.

हेही वाचा – दिल्ली मेट्रोत चक्क ब्रायडल लेहेंगा परिधान करुन फिरताना दिसली नववधू! नवरीवर खिळल्या प्रवाशांचा नजरा, पाहा Viral Video

या घटनेने सोशल मीडियावर लक्ष वेधले असता, IKEA ने माफी मागितली, “ IKEA नागासंद्र येथे झालेल्या त्रासदायक घटनेबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. आम्ही सध्या परिस्थितीची तपासणी करत आहोत आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. अन्न सुरक्षा आणि स्वच्छता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना IKEA मधील सर्वोत्तम खरेदीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.”

या ट्विटमुळे IKEAवर टीका करणाऱ्या वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि भविष्यात अशाच घटना टाळण्यासाठी योग्य कारवाईची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru ikea apologises after customers viral tweet shows dead rat drops on food court table snk