Shocking video: देशभरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी मन खिन्न झालेले असतानाचआणखी एक धक्कादायक आणि किळस आणणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य याठिकाणी घडले आहे. वर्षानुवर्षे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि तरीही अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा गैरवापर करतात आणि काही विकृत लोकं तर हद्दच पार करतात. सध्या असाच धक्कादायक प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका भटक्या श्वानाबरोबर एक तरुण अश्लील कृत्य करतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचे हे क्रूर कृत्य व्हिडीओमध्ये कैद झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला एवढंच नाहीतर त्यानंतर त्यानं त्या कुत्र्याचे गुप्तांगही जखमी केले. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

बेंगळुरूच्या जयनगरमध्ये एका भटक्या कुत्र्याचे लैंगिक शोषण करताना एका विकृत तरणाला पकडण्यात आले. शुक्रवारी पहाटे परिसरातील शालिनी ग्राउंडवर ही घटना घडली. हा तरुण २३ वर्षीय रोजंदारी कामगार आणि बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितला जात आहे. सकाळी आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन आलेल्या एका महिलेनं हा प्रकार पाहिला आणि आरडा ओरडा केला. कुत्र्यांना खायला देणाऱ्याने परिसरातील इतर प्राणीप्रेमींना सावध केले, जे अत्याचार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी धावले. त्यांनी त्या माणसाला पकडले आणि स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. वृत्तानुसार, तो माणूस दारूच्या नशेत होता. प्राणीप्रेमींनी प्रथमोपचार केल्यानंतर कुत्र्याला वाचवण्यात आले आहे आणि पशुवैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले आहे.

महिलेने माध्यमांना सांगितले की, त्या परिसरातील कुत्र्यांशी त्या पुरूषाला लैंगिक संबंध ठेवताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तिने या महिन्याच्या सुरुवातीलाही अशीच एक घटना पाहिली होती, परंतु ती त्याला पकडण्यापूर्वीच तो पुरूष पळून गेला होता, असे तिने नमूद केले. गेल्या वेळी गुन्हेगार ऑटोमधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता, असे तिने नमूद केले. जयनगर पोलिस ठाण्यात बीएनएसच्या संबंधित कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली.

पाहा व्हिडीओ

हा धक्कादायक व्हिडीओ @joedelhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आता यावर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader