Bengaluru Man Post : बंगळुरु येथील माणसाने केलेली पोस्ट ( Bengaluru Man Post )सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. २७ वर्षांच्या या माणसाने सांगितलं आहे माझ्याकडे कूक म्हणून काम करणाऱ्याकडे स्वतःचा कूक म्हणजेच स्वतःचा स्वयंपाकी आहे. माझा स्वयंपाकी माझ्यासाठी अन्न शिजवतो आणि माझ्या स्वयंपाकाच्या स्वयंपाकी त्याच्यासाठी अन्न शिजवतो. एवढंच नाही तर त्याचा कूक त्याला भांडी घासण्यातही मदत करतो. असं बंगळुरुतल्या या २७ वर्षीय माणसाने लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ वर्षांच्या माणसाला ही माहिती कशी मिळाली?

२७ वर्षीय तरुणाने एक पोस्ट ( Bengaluru Man Post ) लिहिली आहे त्यात तो म्हणतो, माझ्या कूकला मी विचारलं की माझं घर रोज स्वच्छ करण्यासाठी, झाडपूस करण्यासाठी कुणी आहे का? एखादी गृहसेविका वगैरे ? त्यावर तो म्हणाला आहे पण ती या कामाचे महिन्याला ३ हजार रुपये घेईल. घर स्वच्छ करेल आणि भांडी घासेल. मी त्याला सांगितलं मागच्या वेळी मी झ्या घरात होतो तो छोटा टू बीएचके फ्लॅट होता त्या ठिकाणी जी गृहसेविका यायची ती महिन्याचे २ हजार रुपये घेत होती. त्यावर माझ्या कूकने मला सांगितलं की माझ्या घरी जी घरकाम करणारी बाई येते ती महिन्याला २ हजार रुपये घेते. तसंच मी माझ्या स्वयंपाक्याला २५०० रुपये महिना देतो. त्याचं म्हणणं ऐकून मी उडालोच. कारण तो १ हजार रुपये मागत होता त्यावरुनही मी त्याच्याशी घासाघीस केली होती. पण बंगळुरुत काहीही घडू शकतं यावर माझा विश्वास बसला असं या माणसाने म्हटलं आहे. Reddit वर ही पोस्ट ( Bengaluru Man Post ) लिहिली आहे.

रेडइटवर ही पोस्ट वाचून कमेंटचा वर्षाव

रेडइटवर ही पोस्ट ( Bengaluru Man Post ) वाचून नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट येत आहेत. तुमच्या घरातला कूक आणखी काही वेगळा व्यवसायही करतो आहे का? त्याने तुम्हाला गृहसेविका किती पगार घेते ते सांगितलं पण त्यात त्याचं २० टक्के कमिशन असेल. तुमच्या कूककडे खरंच कूक आहे का? तुमच्या स्वयंपाकी माणसाकडेही जर कूक असेल तर त्यालाही शोधा. अशा कमेंट सोशल मीडियावर पडत आहेत. एकाने लिहिलं आहे माझ्या कारचा पूर्वीचा चालक स्कोडा रॅपिडने यायचा. आता तुम्ही कुणाचे तरी कूक व्हा असा सल्लाही काहींनी या २७ वर्षीय तरुणाला दिला आहे. कूककडे असलेला कूकही चांगला स्वयंपाक करत असेल असंही काहींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru man cook has his own cook internet asks does cooks cook have a cook scj