Maid CV Viral Photo : कुठेही नोकरीसाठी मुलाखत देताना सर्वात आधी विचारली जाणारी गोष्ट म्हणजे सीव्ही (CV). तुमचा सीव्ही पाहूनच एखाद्या नोकरीसाठी तु्म्ही पात्र आहात की नाही हे ठरवले जाते, त्यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी सीव्ही एक आवश्यक गोष्ट आहे. या सीव्हीमध्ये तुमचे नाव, जन्मतारीखपासून तुमच्या कामाचा अनुभव अशा सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात, त्यामुळे मुलाखत घेणाऱ्यालाही सीव्हीमधून तुमच्याविषयी अनेक गोष्टी माहिती करून घेता येतात. आत्तापर्यंत तुम्ही अनेकांचे सीव्ही पाहिले असतील, पण कधी घरकाम करणाऱ्या मोलकरणीचा सीव्ही पाहिला आहे का? पाहिला नसेल तर आजच बघा. बंगळुरूमधील एका तरुणाने त्याच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईचा सीव्ही बनवला आहे, यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जेव्हा कामवाल्या बाईचा सीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्यांना स्वयंपाक कामाच्या अनेक ऑफर मिळू लागल्या.

तरुणाने त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईचा सीव्ही त्याच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला. यादरम्यान एका उर्वी नावाच्या महिलेने घरकामासाठी बाई पाहिजे अशी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, “हेय चॅट, मी HSR मध्ये कुक शोधत आहे जो माझ्यासाठी काही चांगले साधे घरगुती जेवण बनवू शकेल, जर तुमच्याकडे काही लीड असेल तर कृपया शेअर करा?” यावर बेंगळुरूचे रहिवासी वरुण पेरू यांनी त्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करणाऱ्या बाई रितू यांचा सीव्ही शेअर केला. त्याने आपल्या स्वयंपाकीण बाईचा सीव्ही शेअर करताना लिहिले की, “तुम्ही रितू दीदी HSR च्या मास्टरशेफचा नक्कीच विचार करा. ती तिचे काम अप्रतिम करते, तिच्या हातचे सात्विक घरगुती जेवण चवदार, लज्जतदार आहे! मी बनवलेला त्यांचा बायोडाटा पाठवला आहे, कारण ती या कामासाठी पात्र आहे.”

मास्टरशेफ लेव्हलचा सीव्ही

शेअर केलेल्या सीव्हीमध्ये वरुणने त्यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाई मास्टरशेफ असल्याचे म्हटले आहे. वरुणने स्वयंपाकीण बाईच्या क्वॉलिफिकेशनबरोबर सीव्हीमध्ये वेगवेगळे सेक्शन केले आहेत, ज्यामध्ये MED चे ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्टपणे लिहिलेली आहेत. तसेच त्याने स्वयंपाक करणाऱ्या बाई कोणत्या कामात तज्ज्ञ असते हेही सांगितले आहे. तरुणाने त्यात असेही सांगितले की, त्या गॅस आणि इंडक्शन या दोन्हीवर चांगला स्वयंपाक करू शकतात.

हेही वाचा – Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच

सीव्हीमध्ये असेही म्हटले आहे की, स्वयंपाकीण बाई राजमा-चावल आणि रस्सम चावल यांसारखे पदार्थ बनवण्यापासून ‘स्टाफ-सेफ्टी कुकिंग’मध्ये तज्ज्ञ आहेत. दरम्यान, वरुण नामक तरुणाची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक जण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी कमेंट्समध्ये तर चक्क या मावशींना जॉब ऑफर दिली आहे.