Maid CV Viral Photo : कुठेही नोकरीसाठी मुलाखत देताना सर्वात आधी विचारली जाणारी गोष्ट म्हणजे सीव्ही (CV). तुमचा सीव्ही पाहूनच एखाद्या नोकरीसाठी तु्म्ही पात्र आहात की नाही हे ठरवले जाते, त्यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी सीव्ही एक आवश्यक गोष्ट आहे. या सीव्हीमध्ये तुमचे नाव, जन्मतारीखपासून तुमच्या कामाचा अनुभव अशा सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात, त्यामुळे मुलाखत घेणाऱ्यालाही सीव्हीमधून तुमच्याविषयी अनेक गोष्टी माहिती करून घेता येतात. आत्तापर्यंत तुम्ही अनेकांचे सीव्ही पाहिले असतील, पण कधी घरकाम करणाऱ्या मोलकरणीचा सीव्ही पाहिला आहे का? पाहिला नसेल तर आजच बघा. बंगळुरूमधील एका तरुणाने त्याच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईचा सीव्ही बनवला आहे, यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जेव्हा कामवाल्या बाईचा सीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्यांना स्वयंपाक कामाच्या अनेक ऑफर मिळू लागल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा