रिक्षा चालकांशी भाड्यासाठी भावतोल करणे हे खरंच त्रासदायक गोष्ट असू शकते. कारण हे निराशाजनक, थकवणारी गोष्ट आहे आणि अनेकदा कधीही न संपणाऱ्या लढाईसारखे वाटते. पण जेव्हा ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या राइड-शेअरिंग ॲप्स उपलब्ध झाले तेव्हा अनेकांची ही चिंता दुर झाली कारण या अॅपवर भाड्याची निश्चित-किंमत दिली जात असे त्यामुळे भावतोल करण्यासाठी रिक्षाचालकांशी वाद घालण्याची गरज नव्हती. पण ओला अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना पुन्हा रिक्षाचालकांसह भाड्यासाठी वाद घालून भावतोल करावा लागणार आहे. कारण ओलाने निश्चित भाड्याच्या वैशिष्ट्यात बदल केला आहे.
ओलाने ही सोय काढून टाकल्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे.होय, तुम्ही ते बरोबर ऐकले! ओलाने ऑटो राइड्ससाठी आपल्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. निश्चित भाडे दर्शविण्याऐवजी, ते आता एक भाडे श्रेणी दर्शवत आहे. दिलेल्या श्रेणी पैकी किती भाडे द्यायचे हा निर्णय त्यांनी ग्राहक आणि चालकावर सोडला आहे. उदाहरणार्थ, तुम्ही पॉइंट A ते पॉइंट B पर्यंत प्रवास करत असल्यास, ॲप आता रु. १३०-२००रुपये असे भाडे दर्शवतेआणि अंतिम भाडे ठरवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हरशी भावतोल करावा लागेल. हा बदल १ मार्चपासून लागू झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा