खराब रस्ते आणि न चालता येणारे फुटपाथ या दोन समस्या साधारण देशभरातील प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आहेत. मात्र बंगळुरुमधील मल्लेश्वरम येथील याच समस्येकडे लक्ष्य वेधण्यासाठी तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी मल्लेश्वरममधील १६ क्रॉस रोड या भागातील फुटपाथवरून चालताना करावी लागणारी कसरत दाखवत आहेत. या फुटपाथची स्थिती इतकी वाईट आहे की प्रत्येक पाऊल अगदी संभाळून ठेवावे लागत आहे. यासाठीच तुम्हाला मल्लेश्वरममधील फुटपाथवरून चालयाचे असेल तर भरतनाट्यम येणे आवश्यक असल्याचा टोमणा या व्हिडीओतून लागवण्यात आला आहे. या व्हिडीओतील मुलीही फुटपाथवरून चालण्याआधी पायात घुंगरु बांधून तयार होताना दाखवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१६ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड करण्यात आला आहे. #FoothpathBeku म्हणजेच फुटपाथची गरज आहे या हॅशटॅगसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून १२ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी बंगळुरुमधील अनेक फुटपाथची अवस्था अशीच असल्याने सर्वांनाच भरतनाट्यम शिकण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ सरकारी यंत्रणांवर टिका करण्यासाठी नसून स्थानिकांना फुटपाथ हा तुमची मालमत्ता असून त्याची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे असा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मल्लेश्वरम सोशल नावाच्या एका ग्रुपने हा व्हिडीओ तयार केला आहे. अनेकदा फुटपाथवर कचरा टाकणे, थुंकणे, घरकामानंतरचा मलबा टाकणे अशी कामे नागरिकच करत असल्याने याबद्दल त्यांनी वेळीच काळजी घेत यावर आवर घालण्याची गरज असल्याचे या ग्रुपचे म्हणणे आहे.

येत्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारचे आणखीन व्हिडीओ पेजवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपच्या सदस्यांनी दिली आहे. १ नोव्हेंबर रोजी वृद्ध व्यक्तींसंदर्भातील व्हिडीओ अपलोड करण्यात येणार असून. फुटपाथ ही स्थानिक सरकारबरोबरच आपलीही जबाबदारी असल्याचा संदेश देणार एक मिनीट १२ सेकंदाचा व्हिडीओ चांगल्या कारणासाठी व्हायरल होताना दिसत आहे.