Crime news: मागील पाच वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. अशातच आता बेंगलूरूमधून एक प्रकार समोर आला आहे. या ४ तरूणांनी दिवसाढवळ्या केलेल्या गुंडागर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेंगलूरूमध्ये काही बाईकस्वारांनी रस्त्यात बेशिस्तपणे गाडी चालवण्यासोबतच कारची तोडफोड केल्याची, चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची दखल बेंगलूरू पोलिसांनी देखील घेतली आहे. दरम्यान एफआयआर दाखल करत त्यांनी असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचं ट्वीट करत म्हटलं आहे. कार चालकाने डॅशबॉर्डवरून कॅमेर्यात सारा प्रकार कैद केला आहे. या व्हीडिओमध्ये मुद्दामून वाकड्या तिकड्या बाईक चालवणार्यांना कार चालकाने हॉर्न मारून अलर्ट केले होते, पण उलट त्या बाईकस्वारांनी कार चालकासोबतच गैरवर्तन केले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video Viral: वॉटरपार्कच्या स्लाईडवर खतरनाक अपघात! दोन्ही तरुणींचा भयानक शेवट…
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.