वाहतूक पोलिस अनेकदा आपणाला वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात, त्याचं कारण म्हणजे त्यांना जो मेसेज आपल्यापर्यंत पोहचवायचा आहे तो पटकन पोहचवला जातो. त्यामुळे नव्या जनरेशनला नव्या पद्धतीने पोलिस नियम समजावून सांगत असतात. यासाठी ते कधी विनोदी मिम्सचा तर कधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भयंकर अपघातांच्या व्हिडीओचाही आधार घेतात, त्यांचा उद्देश हाच असतो की, नागरिकांनामध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी.

हेही पाहा- ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार

सध्या पोलिसांनी मुख्य रस्त्यांवर वाहने लावणाऱ्यांना, ‘रस्त्यात वाहने लावू नका, अन्यथा काय होऊ शकतं?’ हे सांगण्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कला कृष्णस्वामी, डीसीपी ट्रॅफिक (पूर्व विभाग), बेंगळुरू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर तीन दुचाकी उभ्या असल्याचं दिसत आहे. काही वेळानंतर अचानक या दुचाकीशेजारी उभे असलेले लोक घाबरून पळत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओ पुढे गेल्यानंतर एक हत्ती या लोकांकडे धावतो आणि रस्त्यावर पार्क केलेली बाईक सोंडेत पकडून जोरात फेकतो, त्यामुळे ती बाईक जमिनीवर पडते.

हेही पाहा- जिद्दीला सलाम! दोन्ही पाय नसतानाही तो डोंगर सर करतोय; Video पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “हे गमतीशीर आहे, पोलिसांना विनोदाद्वारे संवाद साधताना पाहून आनंद झाला.” तर आणखी एका नेटकऱ्याने, “हत्तीला पोलिसात नोकरी द्या, तो त्याच्या कामात चांगला आहे”, अशी मिश्कील कमेंट केली आहे. तर “हत्तीलाही नियम माहित आहेत..सुपर.” असंही एका वापरकर्त्याने लिहलं आहे.

हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये केरळमधील मलप्पुरममध्ये येथे घडली होती. या घटनेनंतर स्थानिक लोक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्तीला मानवी वस्तीतून आणि जंगल परिसरातात नेऊन सोडलं होत. दरम्यान, व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. शिवाय प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजेत कारण ते आपल्याच सुरक्षिततेसाठी बनवले असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

Story img Loader