महिलांच्या मासिक पाळीबाबत समाजात पसरलेला गैरसमज संपवण्यासाठी दोन मुलांनी एक अनोखी गोष्ट केली आहे. एक अभिनव उपक्रम सुरू करत दोघांनीही पुरुषांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. इतरांना हे करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सॅनिटरी पॅड फक्त महिलांनाच दिले जात असले तरी या दोन मुलांनी पॅड विकत घेतले आणि ते महिलांना नव्हे तर पुरुषांना वाटू लागले. सॅनिटरी पॅड्सची खरेदी ही सामान्य गोष्ट आहे, असा तरुणांचा यामगे हेतू होता. कारण आजही लोक ते खरेदी करताना लाज वाटताना दिसतात.
पुरुषांना सॅनिटरी पॅड वितरित करणाऱ्या तरुणांची नावे सिद्धेश लोकरे आणि शांकी सिंग अशी आहेत, जे कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी पुरुषांना सॅनिटरी पॅड वाटतानाचा व्हिडिओही बनवला आहे. दोघांनी मिळून बेंगळुरू शहरातील १०० पुरुषांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्याला त्याने एक उत्कृष्ट कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी पॅड खरेदी करण्यासाठी जाताना लोकांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते हे सांगितले आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, ‘आम्ही सहसा पाहतो की मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स काळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये दिले जातात. मासिक पाळीबाबत गैरसमज आणि गुप्तता राखण्याची काही गरज नाहीये. म्हणून, आम्ही बेंगळुरूच्या रस्त्यावर उतरलो आणि लोकांना याबाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न विचार केला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! एक डास चावल्यावर काय होतं पाहा; शरीरात मलेरिया कसा पसरतो? VIDEO पाहून येईल अंगावर काटा
हा व्हिडिओ गेल्या महिन्यात शेअर करण्यात आला होता, तेव्हापासून तो २२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. व्हिडिओमध्ये सॅनिटरी पॅड गाडीच्या मागे ठेवलेले दिसत आहेत. हे पुरुषांमध्ये वितरीत केले जात आहे आणि त्यांना ते त्यांच्या आई, बहीण, मित्र किंवा मैत्रिणीला देण्यास सांगितले जात आहे. जेणेकरून सॅनिटरी पॅड खरेदी करणे सामान्य होऊ शकेल.या व्हिडीओतून समाजातील वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.