सध्या सोशल मीडियावर एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुचाकीवरुन जाताना तो खराब रस्त्यामुळे खड्ड्यात पडला म्हणून त्याने रस्त्याच्या मधोमध आंदोलन केल्याचा हा व्हिडीओ आहे. देशातभरातील नागरिक खराब रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत.

खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांची सख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे आपल्या भागातील सर्व रस्ते चांगले असावे ही किमान अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. मात्र, ती देखील लोकप्रतिनिधींकडून पुर्ण न झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. तरी देखील अनेक नागरिक खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या रस्त्यांविरोधात उघडपणे आपला रोष व्यक्त न करता, रोज त्या खराब रस्त्यांवरुन प्रवास करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो खराब रस्याविरोधात अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहे.

आणखी पाहा- ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच

मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती सकाळी या रस्त्यावरुन जात असताना त्याचा खराब रस्तामुळे अपघात झाल्यामुळे या बहाद्दराने त्याच रस्त्यावर उपोषण करत रस्ते, वाहतूक प्रशासनासह आणि आमदाराचा निषेध केला. या घटनेचा व्हिडीओ बंगळुरूमधील असून ‘स्पीक अप बंगळुरू’ या ट्विटर हँडलवर तो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ट्विट करताना ट्विटरकर्त्याने म्हटलं आहे की, “आज सकाळी ६ वाजता,सदर व्यक्ती गाडी चालवताना खराब रस्त्यामुळे खड्ड्यात पडली आहे.

मात्र, अद्याप या व्यक्तीला कोणी प्रतिसाद देखील दिलेला नाही. शिवाय जुना मद्रास रोड, बंगळुरु येथील सीव्ही रमण नगरच्या आमदारांचे आभार, ज्यांनी लोकांना दररोज अशा प्रकारचा संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केलं” अशी टीका देखील या ट्विटद्वारे आमदारावर करण्यात आली आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच भरले खड्डे –

या व्हिडिओमधील व्यक्ती अपघातानंतर नगर विकास अधिकाऱ्यांना खराब रस्त्यांबाबत जाब विचारताना दिसतं आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या रस्त्यावरील खड्डे भरले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नागरिकाच्या आंदोलनाला थोडे का होईन यश मिळाल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर अनेक जण मुकाट्याने अत्याचार सहन करतात. मात्र, हा पठ्ठ्या थेट आमदार आणि प्रशासनाला भिडल्याच्या प्रतिक्रियाही येत आहेत.