सार्वजनिक ठिकाणी महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. रस्त्यावरून चालताना अनेकदा महिलांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. काही वेळा परिस्थिती अशी असते की, मदत घ्यायची कोणाची हेच त्यांना समजत नाही. त्यात अनेकदा ऑटोरिक्षा चालकही महिलांशी गैरवर्तन करताना दिसतात. अशाच प्रकारची एक घटना एका तरुणीबाबत घडली आहे. रस्त्याने जाताना तिला एका रिक्षाचालकाचा अतिशय वाईट अनुभव आला. रिक्षाचालक गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेचे काही फोटो तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात तिच्या कपड्यांवर थुंकल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.

संबंधित तरुणी ही बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करते. परिशी, असे तिचे नाव आहे. ती बंगळुरूच्या इंदिरानगर भागातील रस्त्यावरून चालत असताना अचानक एक रिक्षाचालक तिच्या अंगावर गुटखा थुंकून निघून गेला. त्यामुळे तिचा पांढरा शर्ट पूर्णपणे खराब झाला.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली होतो. तिने घातलेल्या शर्टच्या हातावर आणि मागच्या बाजूला गुटख्याचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत. परिशीने फोटो पोस्ट करीत कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तिने लिहिले की, इंदिरानगरमध्ये फिरताना एक रिक्षाचालक माझ्यावर थुंकला, तेही ज्या दिवशी मी पांढरा शर्ट घातला होता.

“ह्यांना मारण्याचा अधिकार दिला कोणी?” मुंबईच्या परळ सिग्नलवरील ट्रॅफिक पोलिसांच्या ‘त्या’ कृत्याने संतापले युजर्स, Video पाहून म्हणाले, “मुजोरी…”

दरम्यान, तरुणीच्या या पोस्टने बेंगळुरू पोलिसांचेही लक्ष वेधून घेतले. पोलिस विभागाने कमेंट्समध्ये तरुणीकडून घटना घडलेल्या परिसराचा संपूर्ण पत्ता, तिचा फोन नंबर, अशी माहिती मागवली आहे. दरम्यान, ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित रिक्षाचालकाच्या वागण्यावर संताप व्यक्त करीत, त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या पोस्टखालीही अनेक युजर्स आपला संताप व्यक्त करतायत.

एका युजरने लिहिले, “हे खूप वाईट आहे!” दुसऱ्या एकाने लिहिले, “याची तक्रार करा. पोलिस सीसीटीव्हीवरून नंबर मिळविण्याचा प्रयत्न करतील. अशा कृत्यांबद्दल शिक्षा व्हायला हवी. ही एक लांब प्रक्रिया आहे, असे वाटेल; पण तो पुन्हा कोणाशीही असे करण्याची हिंमत करणार नाही.” तिसऱ्या युजरने लिहिले, “हे एक घृणास्पद कृत्य आहे!” त्याच वेळी एका युजरने त्याचा अनुभवही शेअर केला, “यार… माझ्याबरोबर एकदा चालत्या बाईकवर असताना असेच घडले होतो. बसचालक माझ्या खांद्यावर आणि हातावर थुंकला. खूप वाईट वाटले.”