सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2024) क्रेझ पाहायला मिळतेय. जसजसे आयपीएलचे सामने पुढे जात आहेत, तसतसे चाहत्यांमध्येही एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. यात स्टेडियममध्ये लाईव्ह मॅच पाहण्यासाठी चाहते तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या खेळाडूने मारलेले चौकार, षटकार लाईव्ह पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. याशिवाय स्टेडियममधील मॅच पाहण्याचा माहोलच काहीसा वेगळा असतो. यामुळे आयपीएल मॅच स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. काही वेळा ऑफिस किंवा घरी खोटं कारण सांगून चाहते मॅच पाहण्यासाठी जातात. अशाचप्रकारे एक तरुणी आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामना पाहण्यासाठी ऑफिसमध्ये एक इमर्जन्सी काम असल्याचे सांगून स्टेडियममध्ये पोहोचली, पण लाईव्ह कॅमेऱ्यात तिला कॅच केले गेले. यावेळी बॉस घरातून सामना पहात होता, ज्यामुळे तिचं खोटं समोर आलं. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आरसीबीची चाहती असलेल्या नेहा द्विवेदीबरोबर ही घटना घडली आहे. नेहाने तिच्या बॉसशी खोटं बोलून ऑफिसमधून हाफ डे सुट्टी घेतली. यानंतर ती आयपीएल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. पण, नेहाला तिच्या बॉसने टीव्हीवर मॅच पाहताना पाहिले. यानंतर तिचा खोटारडेपणा समोर आला. नेहाने या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेली घटना सांगितली आहे.
नेहाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मोये-मोये दिवसेंदिवस खरं समोर येत आहे. नेहा म्हणाली की, स्टेडियमवर मी मॅच पहात असताना बॉसने मला टीव्हीवर पाहिले आणि मेसेज करून चौकशी केली. बॉस कूल होता, त्यामुळे खोटं बोलूनही काही त्रास झाला नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
नेहाने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, स्टेडियममधील प्रत्येक दुसरा व्यक्ती कॅमेरा फोकस करण्याचा प्रयत्न करतो, पण संधी मिळत नाही… आता तुमच्याकडे येत आहे; तर आणखी एका युजरने लिहिले की, तरुणीला ऑफिसमधून काढून टाकायला हवं, कारण आधी ऑफिसमध्ये खोटे बोलली आणि नंतर बॉसबरोबरचे संभाषण शेअर केलं.