Woman LinkedIn Profile Goes Viral : अनेकदा असं होतं की, आपण नोकरी सोडण्यासाठी किंवा नवीन नोकरी सुरु करण्याआधी शंभरवेळा विचार करतो. नोकरी शोधताना काही लोक सावधानताही बाळगतात. पगार आणि पदाशिवाय कामाची पद्धत आणि नवीन ठिकाणच्या परिस्थितीबाबत लोक खूप विचार करत असतात. परंतु, या सर्व सावधानतेशिवाय अनेकदा लोक अशा परिस्थितीत गोंधळतात, ज्यातून सुटका होणे खूप कठीण असतं. बंगळुरुच्या एका महिलेसोबतही असच घडलं आहे. परंतु, त्या महिलेनं निर्णय घेतला की, या गोष्टीला ती जगासमोर आणेल आणि यासाठी तिने लिंक्डइनची मदत घेतली.

बंगळुरुत राहणाऱ्या शिखा गुप्ताने लिंक्डइनवर असं काही लिहिलं की, त्या महिलेचं प्रोफाईल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. ट्वीटर यूजर विबिन बाबूराजनने शिखाच्या लिंक्डइन प्रोफाईलचा एक स्नॅपशॉट ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यानंतर ही व्हायरल पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि प्रचंड व्हायरल होत आहे. शिखाने त्याच्या लिंक्डईन प्रोफाईलवर कामाचा अमुभव सांगत लिहिलं आहे की, ‘चूक झाली. याला बरोबर करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी दिला. पुढे गेलो.’

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

नक्की वाचा – मालकीण गोदावरी नदीत वाहून गेली! कुत्रा चपलेजवळ २२ तास वाट बघतच राहिला, पण…व्हिडीओनं लोकांना रडवलं

यूजर्स म्हणाले, ‘प्रामाणिकपणाचं कौतुक झालं पाहिजे’

ही पोस्ट १५ जुलैला शेअर करण्यात आली आहे. ट्वीटरवर शेअर केल्यापासून या पोस्टला आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच १६०० हून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. या व्हिडीओला यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पोस्टला प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलं, “मलाही एका कंपनीसाठी असं लिहियाचं आहे. या प्रामाणिकपणाचं मी कौतुक करतो.”

Story img Loader